रत्नागिरी-30 शाळांमध्ये वाटली 54 झाडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-30 शाळांमध्ये वाटली 54 झाडे
रत्नागिरी-30 शाळांमध्ये वाटली 54 झाडे

रत्नागिरी-30 शाळांमध्ये वाटली 54 झाडे

sakal_logo
By

-rat२१p११.jpg
44671
- रत्नागिरी : हातिसमधील माडाच्या अमृतमहोत्सवानिमित्त परिसरातील शाळांना ग्रामस्थांनी विविध रोपांचे वितरण केले. सोमेश्वर नागवेकरवाडी आणि तोणदे येथील शाळेत या रोपांची लागवड करताना मुख्याध्यापिका, शिक्षिका, विद्यार्थी आणि ग्रामस्थ
-----------
माडाचाही साजरा झाला अमृतमहोत्सव!

रत्नागिरीतील ३० शाळांमध्ये वाटली ५४ रोपे; शाळा परिसरात लागवड
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : भारत देश स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजर करत असताना हातिसला १५ ऑगस्ट १९४७ रोजी लावलेले माडाचे झाडही अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्यामुळे हातिस ग्रामस्थानी हातिस परिसरातील हरचिरी ते चिंचखरी या गावांतील एकूण ३० शाळाना नारळ (२१), कोकम (१९), सोनचाफा कलमे (८), काजू (५) आणि आंबा (१) अशा एकूण ५४ झाडांचे वाटप करण्यात आले. नुकतीच ही झाडे लावण्यात आली.
ही संकल्पना उपेंद्र नागवेकर आणि कृषी विद्यावेत्ता डॉ. दिलीप नागवेकर यानी मांडली आणि ग्रामस्थांनी त्याला दुजोरा दिला. यासाठी हातिस ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष दिवाकर नागवेकर, उपाध्यक्ष सत्यवान नागवेकर, खजिनदार महेश कीर, सदस्य बिल्वमंगल नागवेकर आणि ग्रामस्थ अनिकेत नागवेकर व शार्दुल नागवेकर यांनी या शाळाना भेटी देऊन त्यांची झाडांविषयीची मागणी नोंदविली. ही झाडे प्रत्येक शाळेत पोहचविण्याची कामगिरी महेश कीर आणि प्रमोद नागवेकर (मानकरी) यांनी पार पाडली. सर्व झाडे डॉ. दिलीप नागवेकर यांनी उपलब्ध करून दिली. झाडे सर्वच शाळानी स्वातंत्र्यदिनी लागवड करण्याचे आवाहन हातिस ग्रामविकास मंडळाने केले होते. त्यानुसार शाळांनी त्यांना मिळालेल्या झाडांची लागवड शाळेच्या परिसरात केली. हातिस ग्रामस्थांच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89091 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..