मालवणात शुक्रवारी मोदक प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणात शुक्रवारी मोदक प्रशिक्षण
मालवणात शुक्रवारी मोदक प्रशिक्षण

मालवणात शुक्रवारी मोदक प्रशिक्षण

sakal_logo
By

मालवणात शुक्रवारी मोदक प्रशिक्षण
मालवण : येथील बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे श्री गणरायाच्या स्वागतासाठी शुक्रवारी (ता.२६) सेवांगण येथे मोदक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. उकडीचे मोदक, सारण, चॉकलेट मोदक, चॉकलेट मिक्स मोदक, मँगो मोदक, रोझ गुलकंद मोदक, पान मोदक, पिनट मोदक, रोझ संदेश मोदक, काजू मोदक, मावा मोदक, टुटीफ्रुटी मोदक आदी प्रकार शिकवले जाणार आहेत. हे प्रशिक्षण शिबिर सकाळी दहा ते सायंकाळी पाच होणार आहे. अधिक माहितीसाठी सेवांगण कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष दीपक भोगटे, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89101 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..