राजापूर-राजापुरातील स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींना उजाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-राजापुरातील स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींना उजाळा
राजापूर-राजापुरातील स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींना उजाळा

राजापूर-राजापुरातील स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींना उजाळा

sakal_logo
By

rat21p22.jpg
44726
राजापूरः ‘राजापूरातील स्वातंत्र्य सैनिक’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना बालसाहित्यिक मदन हजेरी, मजीद पन्हळेकर, बी. के. गोंडाळ, लेखक जगदीश पवार-ठोसर.
-------------
राजापुरातील स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींना उजाळा
राजापूर, ता. २१ः देशाच्या थोर स्वातंत्र्य सैनिकांची आपल्याला माहिती असलीच पाहिजे. पण सामान्यातील सामान्य माणूस स्वातंत्र्य प्रेमाने कसा भारावून गेला होता, आपले सर्वस्व देशासाठी कसा अर्पण करत होता हे समजून घेण्यासाठी, भावी पिढीच्या लक्षात आणून देण्यासाठी राजापुरातील स्वातंत्र्य सैनिक हे पुस्तक फार महत्वाची भूमिका बजावणार आहे, असे प्रतिपादन बालसाहित्यिक मदन हजेरी यांनी केले.
जगदीश पवार-ठोसर यांनी लिहिलेल्या राजापुरातील स्वातंत्र्य सैनिक व परिसर स्पर्श या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. श्री. पवार-ठोसर यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे माय राजापूर संस्थेच्या वतीने प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नगर वाचनालयाच्या सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी सामाजिक कार्यकर्ते मजीद पन्हळेकर, बी. के. गोंडाळ उपस्थित होते. श्री. हजेरी यांनी स्वातंत्र्य सैनिक बंडोपंत पवार-ठोसर, भिकाजीराव उर्फ तात्या चव्हाण, स. मु. ठाकरे यांच्या आठवणीला उजाळा देताना धर्म, जात, पंथ याच्यापलीकडे जाऊन भारतीय म्हणून आपण वागले पाहिजे असे स्पष्ट केले. श्री. पन्हळेकर यांनी प्रत्येक भारतीयांनी आपल्या धर्मापेक्षा, जातीपेक्षा भारतीयत्वाला पाहिले स्थान दिले पाहिजे असे सांगितले. अ‍ॅड. शशिकांत सुतार, प्रकाश भावे, डॉ. छाया जोशी, नायब तहसीलदार दीपाली पंडित, अभय मेळेकर, नित्यानंद पाटील, माजी नगराध्यक्ष सुरेश कोळेकर, राजाभाऊ रसाळ, दीनानाथ कोळवणकर, लियाकत काझी आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89109 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..