उंबर्डे-कुंभारवाडीत रस्ता खचला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उंबर्डे-कुंभारवाडीत रस्ता खचला
उंबर्डे-कुंभारवाडीत रस्ता खचला

उंबर्डे-कुंभारवाडीत रस्ता खचला

sakal_logo
By

44728
खारेपाटण ः गगनबावडा मार्गावरील उंबर्डे-कुंभारवाडी येथे मोरीच्या पाईपला पडलेले भगदाड.

उंबर्डे-कुंभारवाडीत रस्ता खचला

खारेपाटण-गगनबावडा वाहतूक ठप्प; गणेशोत्सवाच्या तोंडावर नवे संकट

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २१ ः उंबर्डे-कुंभारवाडी येथील मोरीच्या पाईपाला आज पहाटे भगदाड पडले. त्यामुळे रस्त्याचा अधिकत्तर भाग खचला आहे. या प्रकारामुळे खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील दुचाकी वगळुन इतर वाहतुक ठप्प झाली आहे. त्यामुळे कुसुरमार्गे भुईबावडा, गगनबावडा वाहतुक वळविण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर निर्माण झालेल्या नव्या संकटामुळे वाहतुकीचा प्रश्न आणखी गंभीर बनणार आहे.
वैभववाडी तालुक्यातील रस्त्याच्या नाजुक स्थितीमुळे तालुक्यातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे चित्र आहे. रस्ता खचल्यामुळे तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील करूळ घाटमार्गावरील जड, अवजड वाहतुक बंद आहे. या मार्गावरील वाहतुक एडगाव तिठा-उंबर्डे-भुईबावडा घाटमार्गे कोल्हापूर अशी सुरू होती. त्यातच काही दिवसांपूर्वी भुईबावडा घाटात देखील दरड कोसळून वाहतुक ठप्प झाली होती. दरड हटविल्यानंतर या मार्गावरील वाहतुक सुरळीत होण्याची सुचिन्हे दिसत असताना आता खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील उंबर्डे-कुंभारवाडी येथील लहान मोरीच्या पाईपाला आज पहाटे भगदाड पडले. त्यामुळे तेथील अधिकत्तर रस्ता खचला आहे. जेमतेम रिक्षा किंवा दुचाकी जाऊ शकेल इतकाच रस्ता शिल्लक असल्यामुळे या मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली आहे. खारेपाटणकडून सुरू असलेली वाहतुक उंबर्डेवरून कुसुरमार्गे वळविण्यात आली आहे. वैभववाडीकडून सुरू असलेली वाहतुक कुसुरमार्गे वळविण्यात आली आहे. गगनबावडा, भुईबावडा मार्गे वैभववाडीकडे येणारी वाहने देखील कुसुरमार्गेच वळविण्यात आलेली आहे. कुसुर मार्गाने अवजड वाहतुक सुरू असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र आहे.
--------
चौकट
रस्ता बंद करावा लागणार
अवजड वाहतुकीमुळेच मोरीचा पाईपाला भगदाड पडले असावे, असे स्थानिक ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर या मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार आहे. पाईपाच्या दुरूस्ती करताना पुर्ण रस्ताच बंद करावा लागणार असल्यामुळे दुरूस्तीसाठी किती दिवस लागतील याचा अंदाज येणे शक्य नाही.
--------------
चौकट
वाहतुकीवरील ग्रहण सुटेना
वैभववाडी तालुक्यातील अनेक रस्त्यांची अवस्था सध्या बिकट आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहनचालक त्रस्त आहे. घाटरस्त्यांची स्थिती तर त्यापेक्षा गंभीर असून सध्या करूळ घाट वाहतुक बंदच आहे तर भुईबावडात सतत दरडी कोसळत आहे. त्यातच आता मोरीच्या पाईपाला भगदाड पडून वाहतुक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील रस्त्याचे ग्रहण सुटण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
--------------
कोट
मोरीला एकूण चार पाईप आहेत. त्यापैकी दोन पाईप पूर्णतः तुटलेले आहेत. पूर्ण रस्ता खोदुन नवीन पाईप घालणे सद्यस्थितीत शक्य नाही; परंतु, मोटार, रिक्षा वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न आहे. यासंदर्भातील अहवाल वरिष्ठांकडे देणार असून त्यांच्या सुचनेनुसार काम करण्यात येईल.
- विनायक जोशी, उपअभियंता, बांधकाम विभाग, वैभववाडी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89112 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..