रत्नागिरी- संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- संक्षिप्त
रत्नागिरी- संक्षिप्त

रत्नागिरी- संक्षिप्त

sakal_logo
By

-rat२१p१७.jpg
44711
- रत्नागिरी : खानूमध्ये ध्वजारोहणाप्रसंगी माजी सैनिक अरुण आठल्ये. सोबत इतर मान्यवर.
----------
खानू ग्रामपंचायतीतर्फे माजी सैनिकांचा सत्कार
रत्नागिरी : तालुक्यातील खानू ग्रामपंचायतीतर्फे माजी सैनिकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सरपंच गणेश सुवारे, माजी सैनिक चंद्रकांत कांबळे, माजी सैनिक अरुण आठल्ये यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त खानूमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. खानू गावामध्ये रांगोळी, पाककला स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांकरीता वक्तृत्व, रांगोळी, चित्रकला आणि घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन केले. स्वच्छता मोहीम, वृक्षलागवड, महिलांकरिता आरोग्य शिबीर, किशोरवयीन मुलींकरिता मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले. प्रभातफेरीमधये मुले व ग्रामस्थांनी पारंपरिक वेशभूषा केली. तसेच विविध गुणदर्शनाचे कार्यक्रमात युवकांनी देशभक्तीपर गाणी गायली, महिलांनी देशभक्तीपर नृत्याचा कार्यक्रम सादर केला. अमित डिके यांच्यातर्फे अंगणवाडीतील मुलांना दप्तर वाटप केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सरपंच गणेश सुवारे, उपसरपंच ज्योती पवार, उमेश साळवी, ग्रामस्थ, आदींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
------------------
-rat२१p१६.jpg
44710
- रत्नागिरी : शिरगाव येथील स्वगृही सेवा संस्थेत गाण्यांचा कार्यक्रम सादर करताना सदानंद बोपर्डीकर. सोबत कौमुदी देसाई आणि प्रा. सौ. जयश्री बर्वे.
------------
स्वगृहीमध्ये गाण्यांचा कार्यक्रम रंगला
रत्नागिरी : शिरगाव येथील स्वगृही सेवा संस्थेच्या शिरीषालय वृद्धाश्रमात सदानंद बोपर्डीकर यांनी सदाबहार कराओके गाण्यांचा कार्यक्रम रंगवला. एक सामाजिक कर्तव्य म्हणून केलेला हा उपक्रम होता. श्री. बोपर्डीकर यांनी चले थे साथ मिलके, आने वाला पल जाने वाला है, अजनबी तुम जाने, हमे और जिने की आदी गाणी सुरेल आवाजात सादर केली. सौ. कौमुदी देसाई यांनी कार्यक्रमाची सुरवात गजानना श्री गणराया या गीताने केली. त्यानंतर श्रावणात घन निळा बरसला, ओ सजना बरखा बहार आयी, रुपेरी वाळूत आदी गीते सादर केली. तसेच अखेरचा हा तुला दंडवत या गीताने गाण्याने लतादिदींना श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी वृद्धाश्रमाच्या संचालिका वीणा लेले उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रा. जयश्री बर्वे यांनी केले. रमेश देसाई आणि दाक्षायणी बोपर्डीकर यांचे सहकार्य लाभले.
---------------
-rat२१p१४.jpg
44691
- रत्नागिरी : होळीसाठी आंब्याची झाडे दरवर्षी उपलब्ध होण्याकरिता हातिस ग्रामस्थांनी ७५ झाडांची लागवड केली. झाडांसमवेत ग्रामस्थ पहिल्या छायाचित्रात तर दुसऱ्या छायाचित्रात लागवड करताना ग्रामस्थ.
-----------
हातिस ग्रामस्थांनी लावली
होळीसाठी आंब्याची झाडे
रत्नागिरी : हातिसमधील जि. प. मराठी शाळेचे यंदा शतक महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने हातिसमध्ये आंब्याची ७५ रोपे लावण्याचा संकल्प केला आहे. त्याची सुरवात करण्यात आली आहे. दरवर्षी होळीसाठी एक आंब्याचे झाड आवश्यक असते, ही प्रथा बंद करणे उचित नसून त्याची पुढील तजवीज करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने भविष्यातील तरतूद म्हणून या ७५ आंब्याच्या झाडांची लागवड हातिस ग्राम विकास मंडळाचे जागेत नदीकिनारी करण्यात आली. हातिस ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष दिवाकर नागवेकर, उपाध्यक्ष सत्यवान नागवेकर, पोलीस पाटील संतोष नागवेकर, माजी अध्यक्ष विजय (बबन) नागवेकर, नीता नागवेकर यांच्या हस्ते पूजा करून लागवड करण्यात आली. या वेळी माजी अध्यक्ष डॉ. दिलीप नागवेकर, महेश नागवेकर, मुख्याध्यापिका श्रीमती निवेंडकर, अंगणवाडी सेविका वेदिका पाटील आणि सोनाली कीर, विणा तथा नानी, संयुक्ता नागवेकर, मिताली नागवेकर उपस्थित होत्या. प्रत्यक्ष लागवड उपेंद्र नागवेकर, सुदर्शन नागवेकर, सुयोग विलणकर, करन नागवेकर, रोहन ठावरे, अनिकेत नागवेकर, यश नागवेकर, साई कीर, मयूर तोडणकर, पारस आंबुलकर या हातिसमधील ग्रामस्थांनी केली. पोमेंडी खुर्द येथील जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटीकेचे प्रमुख राजेंद्र कुंभार यांचे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी हातिस ग्राम विकास मंडळाचे पदाधिकारी आणि हातिस ग्रामस्थानी विशेष सहकार्य केले.
--------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89119 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..