गुहागर-भाजपातर्फे हेदवीमध्ये शस्त्रक्रियापूर्व तपासणी शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुहागर-भाजपातर्फे हेदवीमध्ये शस्त्रक्रियापूर्व तपासणी शिबिर
गुहागर-भाजपातर्फे हेदवीमध्ये शस्त्रक्रियापूर्व तपासणी शिबिर

गुहागर-भाजपातर्फे हेदवीमध्ये शस्त्रक्रियापूर्व तपासणी शिबिर

sakal_logo
By

भाजपतर्फे हेदवीमध्ये तपासणी शिबिर
गुहागर, ता. २१ : तालुका भाजप आणि वालावलकर रुग्णालयातर्फे हेदवीमध्ये शस्त्रक्रियापूर्व तपासणी शिबिर झाले. शिबिरात ९० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५४ रुग्णांना डेरवण रुग्णालय होणाऱ्या मोफत शस्त्रक्रिया शिबिराला जाण्यासाठी सूचना केली आहे. शिबिराच्या सुरवातीला उपस्थित वैद्यकीय पथकाचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर डेरवण रुग्णालयाचे सचिन धुमाळ यांनी शिबिरात तपासणी केल्यानंतर पुढे काय करायचे याविषयी माहिती दिली. डॉ. गुंजोटे यांनी ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना याचा लाभ मिळून फायदा होणार असल्याचे सांगत आयोजक तसेच डेरवण रुग्णालयाचे आभार मानले. शिबिरात ९० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५४ रुग्णांना डेरवण रुग्णालयात होणाऱ्या मोफत शस्त्रक्रिया शिबिराला जाण्यासाठी सूचना करण्यात आली. तेथे पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारकांना १६ प्रकारच्या विविध आजारांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी भाजप उत्तर रत्नागिरी ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर, भाजप गुहागर तालुका सरचिटणीस सचिन ओक, दिलिप गोखले, वेळणेश्वर माजी सरपंच संदिप ठाकूर, नाना निमकर, धनंजय पाटील, विलास नाटुस्कर, शाम विचारे, माजी सैनिक मनोहर लांजेकर, हुसेन भाई, दादू गुरव, जया सावंत उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89126 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..