कोकणात गणेशोत्सवात ठाकरे-शिंदें वादाची किनार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकणात गणेशोत्सवात ठाकरे-शिंदें वादाची किनार
कोकणात गणेशोत्सवात ठाकरे-शिंदें वादाची किनार

कोकणात गणेशोत्सवात ठाकरे-शिंदें वादाची किनार

sakal_logo
By

शिवसेना चिन्ह वापरा
...
चाकरमान्यांचा निरोप ठाकरे की शिंदेंचा?

गणेशोत्सवाची संधी; बैठकांची आखणी सुरू, स्थानिक नेत्यांकडून बैठकांसाठी तारखा निश्‍चित

राजेश कळंबटे ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ ः गणेशोत्सवात न चुकता मुंबईकर चाकरमानी कोकणात दाखल होतो. उत्सव साजरा करतानाच भविष्यातील गावाच्या भूमिकांवरही चर्चांना उधाण येते. याच कालावधीत अनेक ठिकाणी भविष्यातील राजकीय निर्णय होतात. कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला असून सध्या राज्यात सुरू असलेल्या ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्यातील तु तु मै मै चे पडसाद येथे उमटणार हे निश्चित आहे. चाकरमान्यांच्या उपस्थितीत बैठकाही रंगू शकतात. त्यामुळे यंदाच्या उत्सवावर ठाकरे-शिंदे गटातील राजकीय संघर्षाची किनार राहणार असल्याची शक्यता आहे.
कोकण आणि मुंबईचे नाते हे पूर्वांपार आहे. मुंबईकर गेली अनेक वर्षे शिवसेनाप्रमुखांचा संदेश घेऊन कोकणातील गावागावांमध्ये फिरायचे. त्यामुळे निवडणुकांमधील दिशा ही उत्सवावेळी होणाऱ्‍या बैठकांमधूनच ठरायची. जिल्हा परिषद, पंचायत समितीच नव्हे तर ग्रामपंचायतींचेही उमेदवार चाकरमान्यांना विश्‍वासात घेऊनच ठरवले जातात. अनेकवेळा विधानसभा निवडणुकीचे लगीनघाई सुरू झाली की चाकरमान्यांची फौज गावात उतरते. याचाच उपयोग शिवसेना कोकणातील वातावरण निर्मितीसाठी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या राज्यात शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे गटाने आव्हान दिले आहे. शिवसेना आमचीच हे दाखवण्यासाठी शिंदेची धडपड सुरू असून आदित्य ठाकरे राज्यभर दौरे करत शिंदे गटावर कडाडून टीका करत आहेत. आदित्य यांच्या दौऱ्‍यांना मिळणारा प्रतिसाद शिंदेसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. या परिस्थितीमध्ये शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात आदित्य ठाकरेंचे दौरे झाले; मात्र रत्नागिरी जिल्ह्यात अजूनही त्यांनी पाय ठेवलेला नाही. वातावरण निर्मितीसाठी ठाकरेंचे शिवसैनिक गणेशोत्सवातील बैठकांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणारच. भजनं, आरत्यांबरोबर गावागावात होणाऱ्‍या बैठकांमध्ये राजकीय दिशांवरही निर्णय ठरण्याची रित यावेळीही सुरू राहील. गावातील कार्यकर्त्यांनीही याबाबत आखणी सुरू केली आहे. स्थानिक नेत्यांकडून बैठकांच्या तारखाही घेतल्या जात आहेत. रत्नागिरीसह खेड-दापोली-मंडणगड विधानसभा मतदारसंघात हे वातावरण सर्वाधिक पाहण्यास मिळणार यात शंका नाही. त्यापाठोपाठ चिपळूण, लांजा-राजापूरवर प्रभाव राहील. गुहागरमध्ये अजूनही शिंदे गटाचा तेवढासा प्रभाव नाही. चाकरमान्यांमध्येही दोन प्रवाह असल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवावर ठाकरे-शिंदेंचा प्रभाव राहणार हे निश्‍चित आहे.
...
चौकट
कोकणातील लोकांमध्ये राजकीय प्रभावही
कोकण आणि मुंबईचे नाते हे पूर्वांपार आहे. त्यामुळे चाकरमान्यांचा कोकणातील लोकांमध्ये राजकीय प्रभावही आहे. त्याच जोरावर आजपर्यंत शिवसेनेनेही मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यावर वर्चस्व राहिले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89127 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..