दाभोळ-दापोलीत 3 नगरसेवकांची मालमत्ता किती? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

property of 3 corporators in Dabhol-Dapoli
दाभोळ-दापोलीत 3 नगरसेवकांची मालमत्ता किती

दाभोळ-दापोलीत 3 नगरसेवकांची मालमत्ता किती?

दाभोळ : दापोली नगरपंचायतीच्या सत्ताधारी गटात सामील असलेल्या ३ नगरसेवकांनी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करताना सोबत जोडलेल्या शपथपत्रामध्ये त्याचे नावे असलेल्या सर्व मालमत्तेची माहिती न देता काही मालमत्ता लपवून ठेवल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते वासिम मुकादम यांनी केला आहे. या तिन्ही नगरसेवकांना अपात्र करण्यात यावे, अशी लेखी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. दापोलीत ३ नगरसेवकांची मालमत्ता किती, याबाबत आरोपामुळे चर्चेचे पेव फुटले आहे. दापोली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी या राजकीय पक्षांनी आघाडी केली होती. त्यात त्यांचे १६ नगरसेवक निवडून आले होते.

या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना रवींद्र गंगाराम क्षीरसागर (शिवसेना), खालिद अब्दल्ला रखांगे व साधना बाळासाहेब बोत्रे (राष्ट्रवादी) यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रात त्यांच्या नावे असलेल्या संपूर्ण मालमत्तेची माहिती या शपथपत्रात नमूद करणे गरजेचे होते. मात्र, या उमेदवारांनी त्यांचा नावे असेलेली काही मालमत्ता शपथपत्रात नमूद केली तर काही उर्वरित मालमत्ता शपथपत्रात नमूद केली नाही व ती लपवली, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते वासिम मुकादम यांनी केला आहे.

शपथपत्रात नमूद न केलेल्या मालमत्ता..
मुकादम यांनी या तिन्ही नगसेवकांनी शपथपत्रात नमूद न केलेल्या मालमत्तांचा कागदोपत्री शोध घेऊन जाहीर न केलेल्या मालमत्तांची कागदपत्रे जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रार अर्जासोबत जोडली असून या तिन्ही नगरसेवकांना अपात्र करावे, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. आता जिल्हाधिकारी कोणती भूमिका घेतात, याकडे दापोलीकरांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, याबाबत तिन्ही नगरसेवकांशी संपर्क साधला असता त्यांनी काही बोलण्यास नकार दिला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89153 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..