चिपळूण-मृताच्या कुटुंबीयाना मंगळवारी देणार धनादेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-मृताच्या कुटुंबीयाना मंगळवारी देणार धनादेश
चिपळूण-मृताच्या कुटुंबीयाना मंगळवारी देणार धनादेश

चिपळूण-मृताच्या कुटुंबीयाना मंगळवारी देणार धनादेश

sakal_logo
By

मृताच्या कुटुंबीयाना मंगळवारी देणार धनादेश

चिपळुणातील अपघात; सर्वपक्षीय बैठकीत धरले धारेवर
चिपळूण, ता. २१ः शहरातील पॉवरहाऊस येथे शनिवारी कोंडमळा येथील दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. २१) सायंकाळी पाचच्या सुमारास पोलिस ठाण्यात संयुक्त बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदार कंपनीस कोणत्याही स्थितीत गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्याची सूचना करण्यात आली. खड्डे बुजवण्याचे काम सुरू असताना सुरक्षितता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान शनिवारी (ता. २०) अपघातानंतर ठेकेदार कंपनीने अपघाताची जबाबदारी स्वीकारून तरुणाच्या कुटुंबाला दहा लाखाची मदत देण्याचे जाहीर केल्यानंतर रास्ता रोको स्थगित झाला. मंगळवारी धनादेश देण्याचे कंपनीने सांगितले.
शहरातील पावरहाऊस येथे शनिवारी खड्डे बुजवण्याचे काम सुरू असताना कोंडमळा येथील एका दुचाकीस्वाराचा ट्रकखाली सापडून मृत्यू झाला होता. या तरुणावर रात्री ११ वाजण्याच्या मुळगाव कोंडमळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या अपघात प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली. किरण कृष्णा घाणेकर (३२, कोंडमळा) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. या अपघातानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको केला. तासभर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या पार्श्वभूमीवर रविवारी पोलिस ठाण्यात संयुक्त बैठक झाली. या बैठकीस उपविभागीय पोलिस अधिकारी, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप व काँग्रेसचे प्रतिनिधी उपस्थित होते.
...
चौकट
खड्डे बुजविण्याचेही आश्वासन
रविवारच्या बैठकीत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघात होत असल्याचे राजकीय पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी तातडीने खड्डे बुजवण्याची मागणी केली. खड्डे बुजवताना दोन्ही बाजूने वाहतुकीची सुरक्षितता बाळगावी. जेणेकरून कोणतीही अपघात होणार नाहीत. याची दक्षता घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या. ठेकेदार कंपनीने दोन टप्प्यात दहा लाखाची मदत देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार मंगळवारी धनादेश देणार असल्याचे सांगितले. तसेच खड्डे बुजवण्याचे काम सुरू असून गणेशोत्सवापूर्वी सर्व खड्डे बुजवण्याचे मान्य केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89158 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..