श्रावणी आरावंदेकर वक्तृत्वात प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रावणी आरावंदेकर
वक्तृत्वात प्रथम
श्रावणी आरावंदेकर वक्तृत्वात प्रथम

श्रावणी आरावंदेकर वक्तृत्वात प्रथम

sakal_logo
By

श्रावणी आरावंदेकर
वक्तृत्वात प्रथम
कुडाळ, ता. २१ ः स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त (कै.) सौ. विजया वामन पाटणकर वाचनालयातर्फे (तालुका ग्रंथालय) वाचनालयात तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा झाली. आठवी ते दहावी गटातील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा झाली. यात २१ स्पर्धक सहभागी झाले. अध्यक्ष प्रतिभा पाटणकर यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. याप्रसंगी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता धनंजय मिशाळ, कार्यवाह विजय नाईक, सहकार्यवाह रामचंद्र परब, विठ्ठल पाटणकर, भार्गवराम धुरी, राजन पांचाळ, जिल्हा ग्रंथालय संघ सदस्य जयेंद्र तळेकर, सरंबळ हायस्कूल शिक्षक संदीप परब उपस्थित होते. डॉ. दीपाली काजरेकर, गोविंद पवार यांनी परीक्षण केले. श्रावणी आरावंदेकर, अलिशा पाटकर, मनस्वी मर्गज यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले. ग्रंथपाल प्रसाद जाधव, अस्मिता कुडाळकर, बापू सावंत उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89168 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..