शिरगाव बाजारपेठत रस्ता बाजूपट्टी खचली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरगाव बाजारपेठत
रस्ता बाजूपट्टी खचली
शिरगाव बाजारपेठत रस्ता बाजूपट्टी खचली

शिरगाव बाजारपेठत रस्ता बाजूपट्टी खचली

sakal_logo
By

44772
शिरगाव ः येथील खचलेल्या बाजूपट्टीची पाहणी करताना बांधकाम विभागासह स्थानिक.

शिरगाव बाजारपेठत
रस्ता बाजूपट्टी खचली
देवगड, ता. २१ ः देवगड-नांदगाव मार्गावरील शिरगाव बाजारपेठ येथील रस्त्याची बाजूपट्टी अचानक खचली. त्यामुळे हा भाग आता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. किराणा सामानाची मालवाहतूक करणारा ट्रक शिरगाव बाजारपेठ येथे आला असता रस्त्याची बाजूपट्टी अचानक खचली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे ट्रक पुढे घेण्यात आला. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधून शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांनी माहिती दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कणकवली उपकार्यकारी अभियंता ए. आर. बासुथकर यांनी तातडीने घटनास्थळी पहाणी केली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सिमेंट काँक्रीटची संरक्षण भिंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून बांधावी. गणेशोत्सवात या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा असणार आहे, असे मत यावेळी व्यक्त झाले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद साटम, सामाजिक कार्यकर्ते संभाजी साटम, भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम आदी उपस्थित होते. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ग्रामस्थांनी मांडलेल्या सूचना योग्य असून पावसाळा सुरू असल्यामुळे ताबडतोब संरक्षण भिंत बांधणे शक्य होणार नाही. तात्पुरती उपाययोजना करून रस्ता वाहतुकीसाठी योग्य केला जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89176 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..