शिल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिल
शिल

शिल

sakal_logo
By

कोतवडेमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
रत्नागिरी : कोतवडे गावातील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. आठ प्राथमिक शाळेतील ज्या विद्यार्थ्यांना शासनाकडून गणवेश मिळाले नाहीत अशा एकूण ७५ विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्यात आले. त्या मध्ये शर्ट, पॅन्ट, टाय व बेल्टचा समावेश आहे. उंबरवाडी, मुस्लिमवाडी, धामेळेवाडी, ढोकमळे, गावणवाडी, कुंभारवाडा, घारपुरीवाडी, कोतवडे बाजारपेठ या आठ शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशाचा लाभ मिळाला.
--------------
हिंदी काव्यवाचन रंगले
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील हिंदी विभागाच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वच्छता अभियान व राष्ट्रीय हिंदी कवींच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम रंगला. या कवितांचा भावार्थही समजावून सांगितला. हिंदी विभागप्रमुख डॉ. शाहू मधाळे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील हिंदी कवींनी केलेल्या राष्ट्रीय योगदानाची माहिती सुरवातीला दिली. कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांनी घरोघरी तिरंगा अभियानास शुभेच्छा दिल्या. प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी हिंदी विभागाचे कौतुक करून स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या क्रांतिकारक, लेखक आणि राष्ट्रीय नेत्यांच्या महत्त्वपूर्ण कार्यावर प्रकाश टाकला. स्वातंत्र्यलढ्यातील नेते, राष्ट्रपुरूषांविषयी तसेच देशाचे स्वाभिमान व रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती आपण अभिमान, आदर बाळगला पाहिजे, असे मत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रा. कृष्णात खांडेकर यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89199 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..