भंडारी समाजाच्या उत्कर्षासाठी कटिबध्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भंडारी समाजाच्या उत्कर्षासाठी कटिबध्द
भंडारी समाजाच्या उत्कर्षासाठी कटिबध्द

भंडारी समाजाच्या उत्कर्षासाठी कटिबध्द

sakal_logo
By

swt221.jpg
44823
सावंतवाडीः भंडारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविताना मंत्री दीपक केसरकर. सोबत लखमराजे भोसले, नवीनचंद्र बांदिवडेकर आदी. (छायाचित्रःनिखिल माळकर)

भंडारी समाजाच्या उत्कर्षासाठी कटिबध्द
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरः सावंतवाडीत विद्यार्थी गुणगौरव सोहळा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ः माझ्या यशामागे भंडारी समाजाचे मोलाचे योगदान आहे. या समाजाच्या सहकार्यामुळेच आज मी आमदार ते मंत्रिपदापर्यंत मजल मारली. या समाजाच्या उत्कर्षासाठी सदैव कटिबध्द राहीन, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित भंडारी समाजाच्या गुणगौरव कार्यक्रमात केले.
येथील काळसुलकर इंग्लिश स्कूलच्या सभागृहात तालुका भंडारी समाजाच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे उद्घाटन मंत्री केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, अखिल भारतीय भंडारी मंडळाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर, सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर, महिलाध्यक्ष शीतल नाईक, गुरुदास पेडणेकर, दिलीप गोडकर, देविदास आडारकर, बाळा केरकर, प्रसाद आरोंदेकर, गुरुनाथ पेडणेकर, हेमंत करंगुटकर, दिलीप नागवेकर, अशोक दळवी, बाबू कुडतरकर, नारायण राणे आदी उपस्थित होते.
भंडारी मंडळाचे तालुकाध्यक्ष मांजरेकर म्हणाले, ‘‘या गुणगौरवामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि उत्साह पाहायला मिळाला. या सत्कारातून पुढील आयुष्यात सातत्याने यश मिळविण्याची स्फूर्ती विद्यार्थ्यांना निश्चितच मिळेल. शाळेत अनेक मुले जातात; मात्र सत्कार काही जणांचा होतो. उर्वरित मुलांनी या सत्कारातून बोध घेऊन स्वतः गुणवंत बनण्याचा संकल्प करावा. भंडारी समाजबांधवांनी आज कला, नाट्य, पत्रकारिता, शासकीय अशा विविध क्षेत्रांत आपला वेगळा ठसा उमटविला आहे. समाजातील मुलांनी आपले ज्ञान, कौशल्याच्या आधारावर उत्तुंग भरारी घेत समाजाचे नाव उज्ज्वल करावे. समाज नेहमी तुमच्या पाठीशी राहील. स्वतःला ओळखून आपल्या कौशल्यावर सर्व क्षेत्रांत प्रभुत्व मिळवा.’’
यावेळी अंकिता राऊळ, दुर्वा पांढरे, कोमल पेडणेकर, योगिता गोवेकर, नेहा मयेकर, काजल हळदणकर, विशाल पार्सेकर, मंदार नागवेकर, आकांक्षा राऊळ, कोमल पार्सेकर, युक्ता नाईक, कृष्णाजी सातार्डेकर, प्रतिक गोलतकर, नूतन आचरेकर, सुगंधा शिरोडकर, सिद्धी नांदोस्कर, रुचिका मसुरकर, गौरवी खोत, गजानन सावळ, खुशी केरकर, सिद्धी उपरकर, लावण्या रेडकर, करुणा राऊळ, साक्षी पोखरे, शरद सातोस्कर, ललित सातोस्कर, हर्षदा वेंगुर्लेकर, सानिका सासोलकर, दीक्षा सूर्याजी, एकता उपरकर, सर्वेश मांडेलकर, मीनाक्षी माणगावकर, भाग्यश्री कुडाळकर, हर्षदा कोंडी, हेमश्री चिटणीस आदींसह तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन गौरी पेडणेकर, संजय पिळणकर, हेमश्री चिटणीस यांनी केले.

चौकट
सावंतवाडीत लवकरच ‘आचरेकर पॅव्हेलियन’
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे गुरु रमाकांत आचरेकर यांच्या नावाने सावंतवाडीत पॅव्हेलियन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक निधी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल. सावंतवाडी संस्थानचे राजे शिवरामराजे भोसले यांच्या नावाने लवकरच उद्यानाच्या परिसरातील आरक्षित जागेत मराठा समाजाचे वसतिगृह उभे केले जाणार आहे. त्यासाठी राजघराण्याने सहकार्य करावे, असे यावेळी मंत्री केसरकर म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89249 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..