मुणगे हायस्कूलमध्ये पारितोषित वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुणगे हायस्कूलमध्ये पारितोषित वितरण
मुणगे हायस्कूलमध्ये पारितोषित वितरण

मुणगे हायस्कूलमध्ये पारितोषित वितरण

sakal_logo
By

swt223.jpg
44828
मुणगेः पारितोषिक वितरण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना साक्षी गुरव.

मुणगे हायस्कूलमध्ये पारितोषित वितरण
विविध कार्यक्रमः गुणवंत विद्यार्थ्यांचे मान्यवरांकडून कौतुक
सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. २२ः येथील भगवती हायस्कूलच्या सभागृहात विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मुणगे सरपंच साक्षी गुरव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी व्यासपीठावर भगवती हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मोनिका कुंज, गौरी तवटे, रश्मी कुमठेकर, एन्. जी. वीरकर, जिल्हा परिषद शाळा मुणगे नं. १ च्या मुख्याध्यापिका दीपाली वारंग, गजानन राणे, श्री. हिर्लेकर, श्री. कराडे उपस्थित होते. प्राथमिक शाळेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली वारंग यांनी, तर माध्यमिक प्रशालेचे सूत्रसंचालन गौरी तवटे यांनी केले. मुलांनी देशभक्तीपर गीत गायन व नृत्यांचे सुंदर सादरीकरण केले. अध्यक्षपदावरून बोलताना सौ. गुरव यांनी सर्व शिक्षक वर्गासह विद्यार्थ्यांचे कौतुक करून आभार मानले. अवघ्या चार दिवसांच्या कालावधीत मुलांनी उत्कृष्टरित्या कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. कोरोना काळानंतर मुले शिक्षणाच्या प्रवाहात येण्यास आता कुठे सुरुवात झाली असताना अल्पावधीत इतके सुंदररित्या केलेले सादरीकरण कौतुकास्पद होते. उपसरपंच धर्माजी आडकर यांनी मुलांचे कौतुक केले. या कार्यक्रमात मोलाचे सहकार्य केलेल्या सर्वांचे सरपंच गुरव यांनी आभार मानले. यावेळी केंद्र व तालुकास्तरावर चमक दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. गावचा विद्यार्थी प्रथमेश पुजारे याने आचरा मिनी मॅरेथॉन स्पर्धेत तृतीय पारितोषिक मिळविल्याबद्दल त्याला सन्मानित केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दशरथ मुणगेकर, संजय घाडी, प्रमोद सावंत, सदस्य अंजली सावंत, रवीना मालाडकर, निकिता कांदळगावकर, पोलिस पाटील साक्षी सावंत, आरोग्य सेविका चराटकर, सर्व अंगणवाडी सेविका, तलाठी विणा मेहेंदळे, ग्रामसेवक महेश कुबल, ग्रामपंचायत कर्मचारी संतोष पुजारे व मोतिराम वळंजू, पवन स्पोर्ट अॅकॅडमीचे अनिकेत पाटील, शंकर मुणगेकर यांचे विशेष आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89252 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..