चिपळूण ः दिवाळीनंतर कुत्र्यांची होणार नसबंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः दिवाळीनंतर कुत्र्यांची होणार नसबंदी
चिपळूण ः दिवाळीनंतर कुत्र्यांची होणार नसबंदी

चिपळूण ः दिवाळीनंतर कुत्र्यांची होणार नसबंदी

sakal_logo
By

कुत्रे चित्र वापरा
..
दिवाळीनंतर कुत्र्यांची होणार नसबंदी

आरोग्य निरीक्षक निवाते; चिपळुणात उपद्रव वाढला
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २२ ः शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या आणि त्यांच्यामुळे होणारा उपद्रव सातत्याने वाढत आहे. त्यावर उपाय म्हणून दिवाळीनंतर पालिका भटक्या कुत्र्यांची नसबंदी करणार आहे, अशी माहिती पालिकेचे आरोग्य निरीक्षक वैभव निवाते यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात पालिकेने ४२३ भटक्या कुत्र्यांची नसबंदी केली. त्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या काही प्रमाणात कमी झाली; मात्र सध्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव पुन्हा वाढला आहे. पेठमाप बुरटेआळी येथील काव्या बुरटे या चार वर्षाच्या मुलीला रविवारी कुत्र्याने चावा घेतला. त्यानंतर भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी पेठमाप येथील सामाजिक कार्यकर्ते विकी लवेकर यांनी पालिकेकडे केली आहे.
..
चौकट
लहान मुलांना एकटे बाहेर सोडू नये...
या पार्श्वभूमीवर निवाते म्हणाले, श्रावण महिन्यानंतर कुत्री आक्रमक होतात. पालिकेने कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी दहा लाखाचे बजेट तयार केले आहे. पहिल्या टप्प्यात ४२३ कुत्र्यांची नसबंदी केली आहे. दिवाळीनंतर पुन्हा मोहीम सुरू केली जाणार आहे. कुत्र्यांना मारण्याचा प्रयत्न कुणी करू नये. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते हल्ला करतात. कुत्रे गाडीचा पाठलाग करत असतील तर गाडी थांबवावी किंवा गाडीचा वेग कमी करावा. नागरिकांनी आपल्या लहान मुलांना एकटे बाहेर सोडू नये.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89285 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..