बहुजन समाजाकडून ''त्या'' घटनेचा निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बहुजन समाजाकडून ''त्या'' घटनेचा निषेध
बहुजन समाजाकडून ''त्या'' घटनेचा निषेध

बहुजन समाजाकडून ''त्या'' घटनेचा निषेध

sakal_logo
By

swt2211.jpg
44825
सावंतवाडीः बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढून निषेध व्यक्त केला.

बहुजन समाजाकडून ‘त्या’ घटनेचा निषेध
सावंतवाडीत ‘कॅण्डल मार्च’ः राजस्थानमधील विद्यार्थ्यास आदरांजली
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २२ः राजस्थानमधील शाळकरी मागासवर्गीय मुलाने शिक्षकांच्या भांड्यातील पाणी पिल्याने संबंधित शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला केलेल्या अमानुष मारहाणीचा सावंतवाडीत ''कॅण्डल मार्च''ने निषेध करण्यात आला. या मारहाणीत विद्यार्थ्याचा झालेला मृत्यू ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असून, अशा शिक्षकाला देहदंडाची शिक्षा होणे आवश्यक आहे. हा प्रकार म्हणजे संघटित समाजाने असंघटित समाजाची केलेली हत्या असून, यासाठी बहुजन समाजाने संघटित होणे ही काळाची गरज आहे, असे मत निषेध सभेत व्यक्त करण्यात आले.
राजस्थानमधील जाल्लोर जिल्ह्यातील एका शाळेतील मागासवर्गीय मुलाने शिक्षकाच्या पाण्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने संतप्त झालेल्या शिक्षकाने त्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. त्या मारहाणीत त्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा निषेध करण्यासाठी व त्या मुलाला आदरांजली वाहण्यासाठी तालुक्यातील फुले आंबेडकर चळवळीतील विचारशील व कृतिशील कार्यकर्त्यांची सभा येथील समाज मंदिर सभागृहात पार पडली. प्रारंभी मोहन जाधव यांनी प्रास्ताविक करून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवीवर्षातही अशा पाण्यासाठी जीवघेण्या घटना घडतात, याबाबत निषेध व्यक्त केला. प्रा. देविदास बोर्डे, मधुकर जाधव, लाडू जाधव, ममता जाधव यांनी घटनेचा निषेध करून संबंधित मृत विद्यार्थी इंदर मेघवाल या विद्यार्थ्याला आदरांजली अर्पण केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते समता प्रेरणा भूमीपासून बाजारपेठ अशी भव्य ‘कॅण्डल मार्च’ रॅली काढून घटनेचा निषेध केला. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या. गांधीचौकात या रॅलीचे विसर्जन करण्यात आले. तत्पूर्वी ॲड. एस. व्ही. कांबळे, दीपक पडेलकर यांनी मार्गदर्शन केले. या रॅलीत जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यासाठी ‘सामाजिक बांधिलकी’चे रवी जाधव यांनी विशेष सहकार्य केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89297 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..