शिक्षक संघाची स्वाक्षरी मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक संघाची स्वाक्षरी मोहीम
शिक्षक संघाची स्वाक्षरी मोहीम

शिक्षक संघाची स्वाक्षरी मोहीम

sakal_logo
By

शिक्षक संघाची स्वाक्षरी मोहीम
जिल्ह्यात प्रारंभः जुन्या पेन्शनसह विविध मागण्या
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २२ः जुनी पेन्शन व शिक्षकांच्या अन्य विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची राष्ट्रव्यापी स्वाक्षरी मोहीमेचा सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये प्रारंभ केला आहे.
शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित शिक्षकांची नेमणूक करा, २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षक व सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, नवीन शैक्षणिक धोरणातील शिक्षक विरोधी तरतुदी काढून टाका, सातव्या वेतन आयोगाच्या सर्व तरतुदी लागू करा तसेच खंड दोन प्रकाशित करा, शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करा या प्रमुख मागण्या मान्य करून घेण्यासाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने राष्ट्रव्यापी स्वाक्षरी मोहिमेची हाक दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वात संपूर्ण राज्यभर १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या काळात ही मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्गचे वतीने ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे २० ला राज्य, जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांच्या प्रातीनिधिक स्वरूपात सहया घेऊन उत्साहात प्रारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिल्हा सरचिटणीस बाबाजी झेंडे यांनी सर्वाचे स्वागत करून राष्ट्रव्यापी आंदोलनाची सुरुवात स्वाक्षरी मोहिमेद्वारे करून ५ सप्टेंबर शिक्षकदिनी महामहीम राष्ट्रपती, पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना हजारो सहयांचे निवेदन दिले जाणार आहे, असे सांगितले. जिल्हाध्यक्ष राजा कविटकर यांनी जिल्हयातील प्रत्येक शिक्षक बांधवांनी आपल्या शिक्षक बांधवांसाठी स्वाक्षरी मोहीमेत सहभागी होण्याचे आवाहन सुद्धा केले. राज्य संघटक प्रशांत पारकर यांनी जिल्ह्यात ही स्वाक्षरी मोहिम व सप्टेंबरमधील धरणे आंदोलन कशाप्रकारे राबविण्यात येईल, याची माहिती देत जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89299 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..