शासकीय धान्यपुरवठा वेळेत करण्याची मनसेची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासकीय धान्यपुरवठा वेळेत करण्याची मनसेची मागणी
शासकीय धान्यपुरवठा वेळेत करण्याची मनसेची मागणी

शासकीय धान्यपुरवठा वेळेत करण्याची मनसेची मागणी

sakal_logo
By

swt2217.jpg
L44869
सावंतवाडीः तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन देताना मनसे पदाधिकारी.

शासकीय धान्यपुरवठा
वेळेत करण्याची मागणी
सावंतवाडीत मनसेचे तहसीलदारांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २२ः वेळेत चलन पाठवूनही शासकीय धान्य दुकानांमध्ये धान्य विलंबाने पोहोचत असल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आगामी गणेश चतुर्थी सण लक्षात घेता धान्य दुकानांमध्ये वेळेत धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मनसेच्या वतीने तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे करण्यात आली.
याबाबत त्यांनी तहसीलदार पाटील यांना निवेदन दिले. त्यात असे म्हटले की, सावंतवाडी तालुक्यातील 59 शासकीय रेशन धान्य दुकानामध्ये महिन्याच्या शेवटी धान्य उपलब्ध होते. ते वितरित करण्यासाठी पुढे दुकानदारांना बरीच कसरत करावी लागते. शासकीय धान्य मागणीबाबतचे चलन हे पुणे येथून मंजूर होत असून त्यासाठी तालुका पुरवठा विभागाला पंधरा दिवस अगोदरच शासकीय धान्य मिळण्यासाठी चलन पाठवावे लागते. तालुक्यातील सर्व शासकीय धान्य दुकानदारांचे धान्य मागणीबाबतचे चलन पुरवठा विभागाकडे वेळेत पोहोचते; मात्र पुरवठा विभागाकडून ते वेळेत पाठविले जात नसल्याने धान्य दुकानांमध्ये विलंबाने धान्य पोहोचते.
धान्य गोदामात आले तरी त्याचे वाटप करण्यासाठी असणारी वाहतूक यंत्रणा देखील सक्षम नाही. तालुक्यातील रास्त धान्य दुकानदारांना पुरवठा करण्यासाठी असलेल्या ठेकेदाराकडून मनमानी कारभार सुरू असून दोन गाड्या फक्त वितरण करण्यासाठी वापरल्या जात आहेत. त्यामुळे धान्य वेळेत पोहोचण्यात विलंब होतो. या ठेकेदाराने नियमानुसार सात गाड्या वापरणे आवश्यक आहे. परिणामी धान्य वितरणासाठी खासगी ठेकेदारामार्फत गाड्या न घेता एस.टी. बसची मालवाहतूक सुविधा घेण्यात यावी. सध्या सर्वच रास्त धान्य दुकानांमध्ये पॉस मशीनमध्ये तांत्रिक बिघाड सुरू आहे. बहुतांश ठिकाणी सर्व्हर डाऊन असल्याने नागरिकांना रेशन धान्य वेळेत मिळत नाही. याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी; अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे. यावेळी मनसेचे सावंतवाडी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, माजी कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, सचिव कौस्तुभ नाईक, प्रवीण गवस, प्रसाद मिशाळ, मनोज कांबळी आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89303 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..