तेली समाजातर्फे गुणवंतांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तेली समाजातर्फे गुणवंतांचा गौरव
तेली समाजातर्फे गुणवंतांचा गौरव

तेली समाजातर्फे गुणवंतांचा गौरव

sakal_logo
By

तेली समाजातर्फे गुणवंतांचा गौरव
मालवणात कार्यक्रम ः विद्यार्थ्यांसह कर्तृत्ववान व्यक्तींचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २२ : तेली समाज उन्नती मंडळ मालवणचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा भरड येथील हॉटेल लीलांजली हॉल येथे झाला. यावेळी तेली समाजातील विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
उद्योजक सचिन आंबेरकर यांच्या हस्ते संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
यावेळी मंडळाचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष राजन आचरेकर, सदाशिव आरोलकर, मंगेश शेर्लेकर, उदय पाटकर, दिनेश डिचवलकर, गणेश नेरुरकर, शमिका वाडकर, मयुरी वेंगुर्लेकर, भाग्यश्री डिचवलकर, काशिनाथ पेडणेकर, विनायक आरोलकर, राघोबा मिठबावकर, मंडळाचे संस्थापक सदस्य दशरथ कवटकर, बापू तळवडेकर, बाबा आरोलकर, अशोक ओटवणेकर, सुभाष पाटकर, नंदा कोचरेकर, राजकुमार मुणगेकर, अमित मुळदेकर, दिनकर सातार्डेकर, श्रीकृष्ण वालावलकर, रमाकांत शेट्ये आदी उपस्थित होते.
गायत्री आरोलकर व मृण्मयी आरोलकर यांच्या नांदीने कार्यक्रमास सुरुवात झाली. आयुषी आरोलकर हिने गीत सादर केले. सचिव शेर्लेकर यांनी प्रास्ताविक करत मंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी दहावी, बारावी व पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. तसेच डॉ. महेश फोंडेकर दाम्पत्य, रिक्षा चालक सदाशिव आरोलकर, आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर, तेल घाण्याचे व्यावसायिक रमाकांत पेडणेकर यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य गणेश नेरुरकर, शमिका वाडकर, भाग्यश्री डिचवलकर यांच्यासह मंडळाचे संस्थापक सदस्य व २००५ पासून मंडळाच्या कार्यकारिणीत काम केलेल्या २० सदस्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी यारसी पेडणेकर या विद्यार्थिनीला १५ हजार रुपयांची शैक्षणिक मदत सुपूर्द करण्यात आली. अध्यक्ष आचरेकर व बाबा आरोलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सदाशिव आरोलकर, उदय पाटकर यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89304 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..