दोडामार्ग तहसील निवास वर्षानुवर्ष ओस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोडामार्ग तहसील निवास वर्षानुवर्ष ओस
दोडामार्ग तहसील निवास वर्षानुवर्ष ओस

दोडामार्ग तहसील निवास वर्षानुवर्ष ओस

sakal_logo
By

swt२२१९.jpg
४४८७१
दोडामार्गः येथे ओस पडलेल्या शासकीय इमारतीची झालेली दुरवस्था.

दोडामार्ग तहसील निवास वर्षानुवर्ष ओस
इमारत महसूलकडे वर्गः इमारतीवर खर्च अनाढायी, अंधश्रद्धा अन् अफवांचे पेव
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २२ः येथील तहसीलदारांसाठी लाखो रूपये खर्चून बांधण्यात आलेले शासकीय निवासस्थान अक्षरशः ओस पडले आहे. ती इमारत म्हणजे ‘हाँटेड हाऊस’ असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सहजासहजी कुणी त्या इमारतीत राहायला जाण्याचे धाडस करत नसल्याचा एक समज तयार झाला आहे. सार्वजानिक बांधकाम विभागाने ती इमारत तहसीलकडे वर्ग केली असली तरी आतापर्यंत तहसीलदार मोरेश्वर हाडके वगळता एकही तहसीलदार त्या इमारतीत राहायला गेलेले नाहीत. इमरतीबाबत चर्चा काहीही असल्या तरी शासनाचे लाखो रूपये त्या इमारतीवर अनाठायी खर्च झाले आहेत त्याचे काय? हा प्रश्र्न मात्र अनुत्तरीत आहे.
कार्यकारी दंडाधिकारी असलेल्या तहसीलदारांनी मुख्यालयात राहून कायदा व सुव्यवस्था चोख राखावी यासाठी शासनाने तालुक्यात त्यांच्यासाठी निवासस्थान बांधले. सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारत पूर्ण केली; पण वीजजोडणी आणि पाणीपुरवठा वेळेत न दिल्याने इमारत अपूर्ण राहिली. साहजिकच सुरवातीचा काही काळ ती इमारत बंदच राहिली. त्यानंतर सर्व कामे पुर्ण करुन इमारत महसूलकडे वर्ग करण्यात आली. त्यानंतर तत्कालिन तहसीलदार हाडके त्या इमारतीत राहायला गेले. ते येथून गेल्यानंतर मात्र ती इमारत बंदच आहे. दहा वर्षांहून अधिक काळ इमारत बांधून झाला. इमारत वापरात नसल्याने अवतीभोवती झाडी वाढली आहे. इमारतीला गळती लागून ती कमकुवत बनते आहे. आणखी काही वर्षे ती तशीच दुरुस्ती देखभालीशिवाय राहिली तर ती कोसळण्याची भीती आहे. शासनाचे ज्या उद्देशाने ती इमारत शासकीय निवासस्थान म्हणून बांधले तो उद्देश मात्र साध्य झाला नाही, असेच म्हणावे लागेल. दरम्यान, प्रशासनाची बाजू समजून घेण्यासाठी या संदर्भात तहसीलदार अरूण खानोलकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण संपर्क होवू शकला नाही.

चौकट
अफवांचे पेव
हाँटेड हाऊस म्हणजे भुताखेतांचा, अमानवी शक्तींचा वावर असलेली जागा किंवा इमारत. मुख्यतः ही अंधश्रद्धा आहे. त्यावरून अनेक चित्रपट आणि मालिकाही निघाल्यात; पण तसे प्रत्यक्षात काहीच नसते. एखाद्या वास्तूत राहायला गेल्यावर एखादी दुर्घटना घडली, काही आर्थिक, आरोग्यविषयक त्रास जाणवू लागला की सारा दोष त्या वास्तूला दिला जातो. प्रत्यक्षांत त्याची कारणे वेगवेगळी असू शकतात; पण अनेकजण अंधश्रद्धा बाळगतात आणि मग ती वास्तू हाँटेड हाऊस समजली जाते. तहसीलदारांच्या निवासस्थानाबाबतही अशाच अफवा आणि चर्चा सुरू आहेत. त्या थांबायला हव्यात.
--------------
कोट
शासकीय निवाससस्थानाची दिवसेंदिवस दुरवस्था होत आहे. आधीच त्यावर खर्च केलेले लाखो रूपये वाया गेले आहेत. आता पुन्हा प्रशासनातील कुणीतरी आपल्या सुपीक डोक्याचा वापर करून स्वतः आणि ठेकेदाराच्या फायद्यासाठी दुरुस्ती देखभालीवर पुन्हा लाखो रुपये खर्च घालू शकतो. त्यापेक्षा ती इमारत शासनाचे भाड्याला देवून तेवढे पैसे तरी परतावा म्हणून शासकीय तिजोरीत जमा करावे. त्यासंदर्भात संबंधित मंत्र्यांची भेट घेणार आहे.
- सुधीर दळवी, तालुकाध्यक्ष, भाजप, दोडामार्ग
------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89309 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..