वागदेत २८ ला काव्यसंमेलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वागदेत २८ ला काव्यसंमेलन
वागदेत २८ ला काव्यसंमेलन

वागदेत २८ ला काव्यसंमेलन

sakal_logo
By

वागदेत २८ ला
काव्यसंमेलन
कणकवलीः अनुभव शिक्षा केंद्राच्या ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘साद’ टीम, कणकवली व अनुभव शिक्षा केंद्र यांच्यावतीने १५ ते २९ वयोगटातील युवकांसाठी २८ ला सकाळी १० वाजता वागदे येथील गोपुरी आश्रमाच्या बहुद्देशीय सभागृहात जिल्हास्तरीय काव्यसंमेलनाचे आयोजन केले आहे. याचा युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे केले आहे. काव्यसंमेलनासंबंधी अधिक माहितीसाठी सहदेव पाटणकर व श्रेयश शिंदे यांच्याकडे संपर्क साधावा.
-------------
महावितरण विरोधात
आंदोलनाचा इशारा
बांदाः गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना मडुरा दशक्रोशीत मात्र, वीज वितरणचा भोंगळ कारभार सुरू आहे. घेराव, उपोषण छेडल्यानंतर भरीव आश्वासने दिली जातात. त्याची प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे सेवेच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होत पुरवठा खंडित होत असल्याने वीज वितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा मडुरा माजी उपसरपंच उल्हास परब यांनी वीज वितरणला दिला. मडुरा-डिगवाडी परिसरात दोनवेळा विद्युत वाहिन्या तुटण्याचे तसेच गतवर्षी गणेशोत्सवात मडुरा दशक्रोशीतील गावात वीज गुल होण्याचे प्रकार घडले; मात्र यावर्षी तसे सहन केले जाणार नाही. त्यामुळे वेळीच दखल घेत वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासंदर्भात कार्यवाही करावी, अशी मागणी परब यांनी केली आहे.
-------------
वैभव साळसकरांचा
साळशीत सत्कार
शिरगावः देवगड तालुक्यातील साळशी ग्रामपंचायतीच्या १७ ऑगस्टच्या ग्रामसभेत विविध विकासकामांवर चर्चा करण्यात आली. सरपंच वैभव साळसकर यांनी ग्रामस्थांच्या सहभागातून स्वराज्य महोत्सव यशस्वी केल्याबद्दल माजी सरपंच तथा माजी पंचायत समिती सदस्य सुनील गावकर यांनी त्यांचा सत्कार केला. उपसरपंच व सदस्यांचाही सत्कार करण्यात आला. महात्मा गांधी तंटामुक्तीची फेररचना करण्यात करून अध्यक्षपदी प्रभाकर साळसकर यांची फेरनिवड करण्यात आली. महावितरणच्या कामाबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. सत्कार प्रसंगी उपसरपंच अनंत नाईक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक मनीषा मांडे, पोलिस पाटील कामिनी नाईक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
--------------
वेंगुर्लेत शैक्षणिक
साहित्य वाटप
वेंगुर्लेः रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ले मिडटाऊनतर्फे बॅ. खर्डेकर महाविद्यालयामध्ये गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ वेंगुर्लेचे अध्यक्ष सुनील रेडकर, सेक्रेटरी पंकज शिरसाट, आ. डी. सी. संजय पुनाळेकर, सदाशिव भेंडवडे, आनंद बांदेकर, वसंतराव पाटोळे, सुरेंद्र चव्हाण, प्रा. शितोळे, योगेश नाईक, मुकुल सातार्डेकर, प्राचार्य डॉ. विलास देऊलकर उपस्थित होते. यापुढेही रोटरीच्या माध्यमातून गरजू मुलांना शैक्षणिक मदत केली जाणार असल्याचे अध्यक्ष रेडकर यांनी सांगितले.
..................

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89316 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..