रत्नागिरी-संदीप पाल, ॠतुजा सकपाळची सुवर्णमय कामगिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-संदीप पाल, ॠतुजा सकपाळची सुवर्णमय कामगिरी
रत्नागिरी-संदीप पाल, ॠतुजा सकपाळची सुवर्णमय कामगिरी

रत्नागिरी-संदीप पाल, ॠतुजा सकपाळची सुवर्णमय कामगिरी

sakal_logo
By

आंतरमहाविद्यालयीन क्रॉसकंट्री; लोगो
.....
फोटो येत आहे
rat२२p२०.jpg
44890
- रत्नागिरी ः क्रॉसकंट्री स्पर्धेचे उद्घाटन करताना पोलिस निरीक्षक शिरीष सासणे. सोबत मकरंद साखळकर, संदिप तावडे आणि अन्य. (राजेश कळंबटे ः सकाळ छायाचित्रसेवा)
----
- rat२२p२१.jpg
44891
- भाट्ये येथील रस्त्यावरुन क्रॉसकंट्री स्पर्धा धावताना खेळाडू.
----
- rat२२p२२.jpg
44892
- ॠतुजा सकपाळ
----
- rat२२p२३.jpg
44893
- संदीप पाल
--------------
अंतर कापले कमी वेळेत; साधला सुवर्णवेध

संदीप पाल, ॠतुजा सकपाळची सुवर्णमय कामगिरी; डीबीजेसह लांजा कॉलेजला सर्वसाधारण विजेतेपद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ ः मुंबई विद्यापीठांतर्गत कोकण विभागीय आंतर महाविद्यालयीन पुरुष व महिला क्रॉसकंट्री स्पर्धेत पुरुष गटात अलीबागच्या पीएनपी महाविद्यालयाच्या संदीप रामचंद्र पालने ३३.५८ मिनिटांत तर महिला गटात जे. एन. पालीवाला महाविद्यालयाच्या ॠतुजा जयवंत सकपाळने ४४.२७ मिनिटात दहा कि.मी. अंतर पार करत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेचे सर्वसाधारण विजतेपदाचा मान लांजा कॉलेज आणि चिपळूणच्या डीबीजे कॉलेजने मिळवला.
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने याचे आयोजन केले होते. महाविद्यालय क्रीडांगण ते कसोप, पुन्हा माघारी अशी दहा किलोमीटरची क्रॉसकंट्री स्पर्धा सोमवारी (ता. २२) झाली. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील १६८ पुरुष तर ६९ महिलांनी सहभाग घेतला होता. याचे उद्घाटन आणि पारितोषिक वितरणाला वाहतूक पोलिस निरीक्षक शिरीष सासणे, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे चंद्रशेखर केळकर, उपप्राचार्य चिंतामणी दामले, प्रभारी प्राचार्य मकरंद साखळकर यांच्यासह हस्ते झाले. विद्यापिठाचे सदस्य जयवंत माने, कोकण विभाग सचिव चंद्रकांत नाईक, डॉ. शिंदे, सहसचिव शशांक उपशेट्ये, डॉ. विनोद उर्फ बाबू शिंदे, राकेश मालप, अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे संदीप तावडे उपस्थित होते. विजयी स्पर्धकांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेमधून कोकण विभागातील सर्वसाधारण विजेतेपदाचा मानकरीही ठरवण्यात आला. यामधून मुंबई विद्यापीठाच्या स्पर्धेसाठी कोकण विभागाचा संघ निवडण्यात आला आहे. त्यासाठी निवड समितीही ठेवण्यात आली होती.
------
चौकट
स्पर्धेचा निकाल
या स्पर्धेमध्ये एक ते दहा क्रमांक काढण्यात आले. पुरुष गट ः संदीप पाल (पीएनपी कॉलेज), अनिकेत अनंत चांदिवडे (डीबीजे चिपळूण), लक्ष्मण दरवडा (पालीवाला कॉलेज), शाहीद किरलुलकर (वैभववाडी), ओंकार चांदिवडे (चिपळूण), करण माळी (पालीवाला), अनिकेत पवार, यश शिरळकर (लांजा), सुरज शिगवण, संकेत भुवड (डिबीजे चिपळूण). महिला गट ः ॠतुजा सकपाळ (पालीवाला कॉलेज), साक्षी सुभाष पवार (चिपळूण डीबीजे), श्रृती संजय दुर्गवळी (गोगटे कॉलेज) प्रिया कळंबटे, सिध्दी मांडवकर, समिका मांडवकर (सर्व लांजा), सायली घवाळी (गोगटे कॉलेज), तन्वी मरगज (खोपोली), वैशाली गोताड (एएसपी कॉलेज), अक्षता घाडी (एससीएस लांजा).
---
चौकट
विद्यापीठस्तरावर पदकासाठीचे आव्हान..
सकाळी साडेसहा वाजता ही स्पर्धा सुरू झाली. गोगटे-जोगळेकर महाविद्यालय ते कसोप असा चढ-उताराचा मार्गक्रमण करत अडीचशेहून अधिक खेळाडू पुढे सरकत होते. समुद्र किनाऱ्‍यावरुन धावणाऱ्‍या खेळाडूंनी वातावरणाचा मनमुरादपणे आनंद घेतला. दोन्ही गटातील पहिल्या दोन्ही क्रमांकाच्या खेळाडूंनी कमी कालावधीत अंतर कापून विद्यापीठस्तरावर पदकासाठीचे आव्हान निर्माण केले आहे.
..
चौकट
दहा कि.मी. अंतर पार करण्याचा नवा विक्रम...
संदीप रामचंद्र पालनेः ३३.५८ मिनिटांत
ॠतुजा जयवंत सकपाळनेः ४४.२७ मिनिटात

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89334 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..