संगमेश्वर-महामार्गावरील खड्ड्यांमुळे चाकरमान्यांचे हाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संगमेश्वर-महामार्गावरील खड्ड्यांमुळे चाकरमान्यांचे हाल
संगमेश्वर-महामार्गावरील खड्ड्यांमुळे चाकरमान्यांचे हाल

संगमेश्वर-महामार्गावरील खड्ड्यांमुळे चाकरमान्यांचे हाल

sakal_logo
By

फोटो येत आहे
...
-rat२२p२.JPG
44908
संगमेश्वर ः संगमेश्वर पट्ट्यात महामार्गावरील रस्त्याची झालेली दुर्दशा.
-----------------
खराब रस्त्याची मलमपट्टी; प्रवासात चाकरमान्यांची कसोटी

महामार्गावरील हाल; ठेकेदार कंपन्यांचा हलगर्जीपणा, संगमेश्वर पट्ट्यात रस्त्याची चाळण
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २२ ः कोकणातील गणेशोत्सवाचा सण आला की, दरवर्षी सरकार चार दिवस आधी खड्डे भरण्याचे आश्वासन देते. प्रत्यक्षात त्यावर थातूरमातूर काम केले जाते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदादेखील गणेशभक्तांना मुंबई-गोवा महामार्गांवरील खड्ड्यांचा सामना करावा लागणार आहे. सध्या मुंबई-गोवा महामार्गावरून वाहन चालवणे अतिशय कठीण झाले आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे खड्ड्यात पडून अनेक दुचाकीस्वारांवर जायबंदी होण्याची वेळ आली आहे.
या महामार्गावरून गाडी चालवणे म्हणजे मृत्यूच्या मार्गाने जाणे, अशी संतप्त प्रतिक्रिया वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. पुढील आठवड्यात मोठ्या संख्येने चाकरमानी जिल्ह्यात दाखल होतील; मात्र त्यांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागणार आहे. संगमेश्‍वर ते बावनदीदरम्यान महामार्गाला मोठमोठे खड्डे पडले आहेत. संगमेश्‍वरातील सोनवी पुलावरून चालणेदेखील अवघड झाले आहे. मोठमोठे कंटेनर या पुलावरून जात असल्याने रस्त्यांची पूर्णतः चाळण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी महामार्गाची अशी अवस्था आहे. खेडपासून व वाकेडपर्यंत मार्गावर चाकरमान्यांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागणार आहे.
महामार्गावर संगमेश्वरनजीक शास्त्री पूल ते गोळवलीदरम्यान पावसाळ्यापूर्वी ठेकेदार कंपनीने एकूण १४ ठिकाणी सध्या सुरू असणाऱ्या मार्गावर पाणी जाण्यासाठी पाईप टाकण्याचे काम केले. या कामाच्या पूर्ततेनंतर या सर्व खोदलेल्या ठिकाणी डांबरीकरण करणे आवश्यक असताना ते केले गेले नाही. या कामावर लक्ष ठेवण्यासाठी असलेल्या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनीदेखील पाणी जाण्यासाठी पाईप टाकलेल्या ठिकाणचे डांबरीकरण करण्यास कंपनीला सूचना दिल्या नाहीत. जर अशा सूचना देऊनही ठेकेदार कंपनी दुर्लक्ष करत असेल तर कंपनीवर कोणती कारवाई केली, हे देखील अधिकारीवर्गाने स्पष्ट केलेले नाही. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून दिल्या जाणाऱ्या पत्रांची ठेकेदार कंपनी दखल घेत नाही, असे अधिकारी खासगीत सांगतात.
....
चौकट
ठेकेदार कंपनीवर कठोर कारवाई करा
सद्यःस्थितीत शास्त्री पूल ते गोळवलीपर्यंत जाताना असणाऱ्या १४ ठिकाणच्या खोदलेल्या भागातून वाहनांना जायला १५ मिनिटांच्या अंतरासाठी ४५ मिनिटांचा कालावधी लागत आहे. अवजड वाहनांसह छोटी वाहने पंक्चर होऊन वाहनांचे नुकसान होऊन वेळही वाया जात आहे. परिणामी बेदरकारपणे वागणाऱ्या या ठेकेदार कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी संगमेश्वर वाहतूक संघटनेचे अध्यक्ष परशुराम पवार यांनी केली आहे.
-----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89336 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..