ई-पीकपाणी नोंदणी शेतकऱ्यांना सोनेरी संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ई-पीकपाणी नोंदणी शेतकऱ्यांना सोनेरी संधी
ई-पीकपाणी नोंदणी शेतकऱ्यांना सोनेरी संधी

ई-पीकपाणी नोंदणी शेतकऱ्यांना सोनेरी संधी

sakal_logo
By

-rat२२p१७.jpg
L४४८५९
पाले ः शेताच्या बांधावर ई-पीकपाणी नोंदणीचे प्रात्यक्षिक दाखवताना अधिकारी सोबत तहसीलदार दत्तात्रय बेर्डे, प्रकाश साळवी.
--------------
ई-पीकपाणी नोंदणी शेतकऱ्यांना सोनेरी संधी

दत्तात्रय बेर्डे; पालेगावी शेताच्या बांधावर प्रात्यक्षिक
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २२ ः ई-पीक पाणी काळाची गरज असून शेतकऱ्यांना मिळालेली सुवर्णसंधी आहे. शेतकऱ्यांनी याची जागरूकतेने माहिती घेत आपल्या पिकपाण्याची नोंदणी करावी, असे आवाहन तहसीलदार दत्तात्रय बेर्डे यांनी केले. १९ ऑगस्टला पाले ग्रामपंचायत येथील कार्यक्रमात ते बोलत होते. माझी शेती, माझा सातबारा, माझा पिकपेरा या घोषवाक्याच्या आधारे महसूल विभागाच्यावतीने पालेगावी शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रात्यक्षिक घेण्यात आले.
या वेळी बेर्डे म्हणाले, शेतकऱ्यांनी आपल्या शेतात घेत असलेल्या उत्पादनाची माहिती, फळलागवड आपल्या सातबारावर ऑनलाइन भरायची आहे. त्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. भविष्यात शेतकऱ्यांना घेतलेल्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी त्याचा उपयोग होणार असून पीकपाणी नोंद असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे तसेच आधारकार्ड मतदान कार्डाला संलग्न करण्याची मोहीम सुरू आहे. आता जरी ते ऐच्छिक असेल तरी पुढे त्याची आवश्यकता लागणार आहे. आपल्या बीएलओ, अधिकारी यांचे सहकार्य घेऊन जागरूक नागरिक म्हणून यामध्ये कृतिशील व्हावे, असे त्यांनी सांगितले. मंडळ अधिकारी प्रकाश साळवी यांनी उपस्थित ग्रामस्थ महिलांना शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन त्यातील नोंदीच्या पद्धती कृतीत सविस्तरपणे सांगितल्या. या वेळी सरपंच संध्या वणे, मंडळ अधिकारी एस.गावकर, तलाठी मयुर पंडित, ग्रामसेवक संतोष आग्रे, सदस्य सहदेव माळी, उज्ज्वला लोंढे, बळीराम जाधव, निलेश रक्ते, विश्वास रक्ते, पांडुरंग रक्ते, नथुराम वणे, अमोल माळी, सदाशिव जाधव, देवेंद्र दुर्गवले यांच्यासह ग्रामस्थ, महिला उपस्थित होते.
-------
चौकट
बांधावर पीकपाणी नोंदीचे प्रात्यक्षिक
मार्गदर्शनानंतर गवातील शेतकरी विश्वास रक्ते यांच्या शेताच्या बांधावर जाऊन त्यांच्या ई-पीकपाणी नोंदीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. ऑनलाइन फॉर्म कसा भरावा, कोणत्या विभागात कोणती माहिती भरावी याचे कृतीशील प्रात्यक्षिक तलाठी मयूर पंडित यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दाखवले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89340 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..