रत्नागिरी- श्रेया कुलकर्णी ठरली मानकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- श्रेया कुलकर्णी ठरली मानकरी
रत्नागिरी- श्रेया कुलकर्णी ठरली मानकरी

रत्नागिरी- श्रेया कुलकर्णी ठरली मानकरी

sakal_logo
By

-rat22p18.jpg
L44864
- रत्नागिरी : मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांसह श्री. दधीच, मत्स्य महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिंगारे, अॅड. विलास पाटणे, अभिजीत हेगशेट्ये, प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, सीमा हेगशेट्ये आदी.
-------------
वक्तृत्वात श्रेया कुलकर्णी अव्वल

राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा; अभ्यंकर कॉलेजने पटकावला चषक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ : (कै.) मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेमध्ये श्रेया उमेश कुलकर्णी हिने प्रथम क्रमांक पटकावला. जिल्हास्तरीय कनिष्ठ गटामध्ये सृष्टी शिंदे, जिल्हास्तरीय माध्यमिक गटामध्ये अंशिका तिवारी (इंग्रजी) आणि संस्कृती कटके (मराठी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेचा वरिष्ठ गटाच्या सांघिक चषकावर आठल्ये- सप्रे महाविद्यालयाने आणि जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन गटाच्या चषकावर अभ्यंकर-कुलकर्णी महाविद्यालयाने नाव कोरले.
प्रमुख अतिथी म्हणून जे. एस.डब्ल्यू जयगडचे सीएसआर प्रमुख श्री. दधीच, मत्स्य महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिंगारे, अॅड. विलास पाटणे, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये, प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, नवनिर्माण हायच्या संचालिका सीमा हेगशेट्ये, नवनिर्माण हायच्या मुख्याध्यापिका नजमा मुजावर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना गौरवण्यात आले. परीक्षक म्हणून राज्यस्तरीय वरिष्ठ गटासाठी प्रा. शिवराज गोपाळे, प्रा. प्रकाश नाईक यांनी, जिल्हास्तरीय कनिष्ठ गटासाठी प्रा. शंकर जाधव, माजी सरपंच आणि कांचन आंब्रे आणि माध्यमिक गटासाठी मुख्याध्यापिका सारिका गुजराती व शिवाजी सावंत यांनी काम पाहिले.
------
चौकट 1
स्पर्धेचा निकालः
राज्यस्तरीय वरिष्ठ महाविद्यालयीन गट- श्रेया कुलकर्णी (भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालय, रत्नागिरी), सिद्धी नार्वेकर (मुंबई उपकेंद्र रत्नागिरी), स्वरूप दोरखडे (आठले- सप्रे कॉलेज, देवरुख), तनुजा शिवतरकर (आठले सप्रे कॉलेज देवरुख), सानिका पवार (फिनोलेक्स कॉलेज रत्नागिरी). जिल्हास्तरीय कनिष्ठ गट- सृष्टी शिंदे (डीबीजे कॉलेज, चिपळूण), जान्हवी जोशी (अभ्यंकर कुलकर्णी कॉलेज रत्नागिरी), अथर्व दळवी (रोटरी ज्युनियर कॉलेज खेड), साक्षी पवार (न्यू इंग्लिश स्कूल लांजा), नेहा शेणवी (नवनिर्माण कॉलेज रत्नागिरी). जिल्हास्तरीय माध्यमिक गट मराठी माध्यम- संस्कृती कटके (डीजे सामंत स्कुल पाली) चैत्राली सावंत (नवनिर्माण हाय), मानसी पालांडे (दलवाई हायस्कूल मिरजोळी चिपळूण), शिवम बेंद्रे (नवनिर्माण हाय), संजीवनी मोहिते (एनजी कुलकर्णी विद्यालय सागवे राजापूर). माध्यमिक गट इंग्रजी माध्यम- अंशिका तिवारी (जिंदल विद्यालय, जयगड), रोज मारिया सोजेन कुरीसिंगल (एसव्हीआयसीआय सावर्डे, चिपळूण), श्रावणी गुरव (नवनिर्माण हाय), उत्तेजनार्थ मीरा जोशी (नवनिर्माण हाय), अथर्व बनसोडे (माने इंटरनॅशनल स्कूल रत्नागिरी).

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89342 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..