चिपळूण ः शिवेसनेला लागली कुणबी सेनेची हाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः शिवेसनेला लागली कुणबी सेनेची हाय
चिपळूण ः शिवेसनेला लागली कुणबी सेनेची हाय

चिपळूण ः शिवेसनेला लागली कुणबी सेनेची हाय

sakal_logo
By

- ratchl२२२.jpg
44860
ः चिपळूण ः पत्रकार परिषदेत आरक्षणाविषयीची भूमिका माडंताना विश्वनाथ पाटील व सहकारी.
---------------
कुणबींना स्वतंत्र आरक्षण हवे

कुणबीसेना प्रमुख विश्वनाथ पाटील; राज्यव्यापी निर्धार परिषद घेणार
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २२ ः कुणबी समाज शिवसेनेचा मुख्य गाभा असूनही या समाजाचा फायदा उठवला गेला. सध्याच्या शिवसेनेच्या राजकीय परिस्थितीला कुणबी समाजाची हाय लागली आहे. शिवसेनेने नव्हे तर इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही गेल्या ३० वर्षात या समाजाचा राजकीय फायदा उठवला. आता मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे आल्याने ओबीसी आरक्षणाला धक्का बसणार आहे. समाजातील सर्वात मोठा वर्ग असलेल्या कुणबी समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी आहे. त्यासाठी दोन महिने राज्यव्यापी निर्धार परिषद राबवली जाणार असल्याची माहिती कुणबीसेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
स्वतंत्र आरक्षणासाठी राबवण्यात येणाऱ्या निर्धार परिषदेच्या पार्श्वभूमीवर येथे कुणबीसेना व बहुजनविकास आघाडी यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीला सुरेश भायजे, राजाभाऊ कातकर, दादा बैकर, डॉ. विकास पाटील, संदेश गोरिवले, संजय जाभरे आदी उपस्थित होते. बैठकीनंतर पाटील म्हणाले, कुणबी सेनेच्या स्थापनेपासून समाजाच्या विविध मागण्यांसाठी लढा सुरू आहे. शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ हे त्याचेच फलित आहे; परंतु राज्यातील एकूण कुणबी समाजाचा विचार करता महामंडळास दिलेला ५० कोटीचा निधी अपुरा आहे. याशिवाय या महामंडळाची अत्यंत घाईघाईने रचना केली असून त्यात अनेक त्रुटी आहेत. कोकणात १९८२ पर्यंत कुणबी समाजाचे आमदार, खासदार विजयी व्हायचे; परंतु नंतर राजकीय परिस्थिती बदलत गेली.
..
चौकट
राज्यभर निर्धार परिषद घेणार
मुंबईसह कोकण, खाणदेश, विदर्भ, मराठवाडा या प्रांतात कुणबी समाज बांधव मोठ्या संख्येने आहे. या समाजाची गणना ३७० च्यावर जाती असलेल्या ओबीसी प्रवर्गात केल्याने पुरेसा लाभ मिळत नाही. परिणामी तरुणांना बेरोजगारीचा जबर फटका बसत आहे. याविषयी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कुणबी समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आग्रही मागणी केली आहे. त्यासाठी समाजातील प्रभावी संघटना एकत्रित आल्या असून कोकणातील बहुजन विकास समितीदेखील संघटित झाली आहे. राज्यभर निर्धार परिषदा घेतल्या जाणार असून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून त्याची सुरवात केली जाईल, अशी माहिती पाटील यांनी दिली.
-------
चौकट
आता कोणाच्याही पाठी जाणार नाही
आता कोकणातील शेती अडचणीत आल्याने त्याचा सर्वार्धिक फटका कुणबी समाजाला बसतो आहे. त्याबाबतचे गाऱ्हाणे आतापर्यंतच्या सर्वच मुख्यमंत्र्याकडे मांडूनही सुटलेला नाही. अगदी कुळाचा प्रश्नदेखील खितपत पडला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीदेखील दिलेला शब्द मोडला. त्यानतंरच्या सरकारनेदेखील या समाजाची दिशाभूल केली. शिवसेनेला तर या समाजाने भरभरून दिले; परंतु शिवसेना सरकारने देखील या समाजाची दखल घेतली नाही. समाजाच्या पदाधिकाऱ्यांचा वापर केला; मात्र आता कोणत्याही राजकीय पक्षाच्या पाठी समाज जाणार नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89352 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..