खेड- संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड- संक्षिप्त
खेड- संक्षिप्त

खेड- संक्षिप्त

sakal_logo
By

आत्मविश्‍वास हीच यशाची गुरूकिल्ली
खेड ः आजचे जग स्पर्धेचे आहे. या स्पर्धेत प्रत्येकजण स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असतो. या प्रयत्नांना आत्मविश्‍वासाची जोड दिल्यास यश प्राप्त होते. आत्मविश्‍वास हीच यशाची गुरूकिल्ली आहे. असे प्रतिपादन पुणे येथील सर फाऊंडेशनचे अध्यक्ष हरिश बुटले यांनी केले. वेरळ येथील श्री समर्थकृपा इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. बारावीतील जय कालेकर या विद्यार्थ्यांने योगाची प्रात्याक्षिके व आठवीतील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. सुत्रसंचालन श्‍वेता शिर्के, जरीन बटे तर आभार प्रदर्शन तेजश्री लाड यांनी केले. या प्रसंगी सुयश पाष्टे, उपाध्यक्षा सुप्रिया पाष्टे, सचिव डॉ.संजना पाष्टे, उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, सदस्य गणेश गीते, प्राचार्य डॉ.अली, शैक्षणिक सन्मवयक डॉ.अजित भोसले, पर्यवेक्षक अभिषेक घोसाळकर उपस्थित होते.
--------------
संकल्पर्फे साहित्याचे होणार वाटप
खेड ः नवी मुंबई तुर्भे येथील संकल्प सामाजिक स्वयंसेवा संस्थेच्या वतीने तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सेवा सुविधा पुरवणे या कार्यक्रमातंर्गंत २३ ते २६ ऑगस्ट या कालावधीत दुर्गम भागातील शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत शालोपयोगी साहित्यांचे वाटप केले जाणार आहे. संस्थाध्यक्ष अशोक सकपाळ गेल्या ११ वर्षापासून गरजूंना शालोपयोगी साहित्य पुरवण्याचा उपक्रम राबवत आहेत. त्यानुसार यावर्षी बोरज व दहीवलीपर्यंतच्या १९ शाळांमध्ये वह्या, दफ्तर, गणवेश व एका शाळेस संगणकाचे वाटप केले जाणार आहे. निगडे -बोरज नं. १, नं. २, निगडे-बारकोंडवाडी, बोरज-शेवरवाडी, बिजघर-कुदळवाडी, तिसंगी हायस्कूल, आनंदाश्रम मठ खोपी, बिजघर कोंड, वाक्षेपवाडी, देवघर विद्यामंदिर, तळे-जांभूळवाडी, सोंडे, तळे -देऊळवाडी, झोळीचीवाडी, धनगरवाडी, मांडवे, मांडवे -कोसमवाडी, वाडीजैतापूर, पुरे खुर्द तसेच दापोली -रुखी व बहिरवली शाळांचा समावेश आहे.
-------------
ज्ञानदीपच्या तिघांचे यश
खेड ः श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्यामंदिरमध्ये बारावी वाणिज्य शाखेतील मंगेश शिंदे, दृष्टी शिंदे, उरूसा पांगारकर हे तीन विद्यार्थी सीए फाऊंडेशन परीक्षा उर्तीर्ण झाले. गेल्या तीन वर्षांत प्रशालेतून सीए फाऊंडेशनसाठी ११ विद्यार्थी उर्तीण झाले आहेत. उतीर्ण विद्यार्थ्यांना तज्ञ मार्गदर्शक श्रीरंग बापट, विठ्ठल सुकंडे, कांतीनाथ शिंदे, मारुती आडाव, चंद्रसेन घुबरे, संजय पाटील, रवींद्र ओकटे, महेश बंडकर, संजोग जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी यांच्याहस्ते या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
----------------

--------------
आयसीएस कॉलेजमध्ये ई -बुक्सचे प्रदर्शन
खेड ः आयसीएस महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने डॉ. रंगनाथन जंयती साजरी करण्यात आली. याचवेळी भरविण्यात आलेल्या ई-बुक्स व ई-जर्नल्स प्रदर्शनाचे उद्घाटन तहसीलदार सौ. प्राजक्ता घोरपडे यांच्याहस्ते करण्यात आले. ग्रंथपाल डॉ. राजेश राजम यांनी डॉ. रंगनाथन यांचा जीवन प्रवास उलगडला. तहसीलदार सौ. घोरपडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पोलिस निरीक्षक निशा जाधव, मंगेश बुटाला, अ‍ॅड. आनंद भोसले, उत्तमकुमार जैन, प्राचार्य डॉ. एच. पी. थोरात आदी उपस्थित होते.
-------------
मुरली मनोहर नागरीची २८ ला सभा
खेड, ः श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा २८ ऑगस्टला सकाळी ११ वाजता पतसंस्थाध्यक्ष संजय मोदी यांच्या अध्यक्षतेखाली (कै.) बी. एस. मेहता सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. सभेत ताळेबंद व नफा -तोटा पत्रक मंजूर करणे, तपासणी अहवाल अवलोकनी घेणे, नफावाटणी मंजूर करून लाभांश जाहीर करणे, संचालक मंडळाकडून आलेली खर्चाचे अंदाजपत्रक मंजूर करणे, अंदाजपत्रकापेक्षा जादा खर्चास मान्यता देणे यासह अन्य विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. सभासदांनी सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप मोदी यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89355 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..