चिपळूण ः अलोरे येथे तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः अलोरे येथे तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा
चिपळूण ः अलोरे येथे तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा

चिपळूण ः अलोरे येथे तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा

sakal_logo
By

-rat२१p२३.jpg
44736
-अलोरे ः बॅडमिंटन स्पर्धेतील यशस्वी खेळाडू आणि असोसिएशनचे पदाधिकारी.
----------
कांबळे अॅकॅडमीचे खेळाडू चमकले; वर्चस्व गाजवले

अलोरेत तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा; विजेत्यांचा गौरव
चिपळूण, ता. २२ ः चिपळूण बॅडमिंटन असोसिएशनतर्फे अलोरे येथे तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत एकूण ५० खेळाडूंनी सहभाग घेतला. चिपळुणातील मयूर कांबळे बॅडमिंटन अॅकॅडमीच्या सर्व खेळाडूंनी स्पर्धेवर आपले वर्चस्व गाजवले.
अलोरे येथील कोळकेवाडी धरण व्यवस्थापन उपविभागाचे उपअभियंता दीपक गायकवाड, विद्युत व वसाहत पुरवठा उपविभाग अलोरेचे सेवानिवृत्त उपअभियंता मिलिंद चव्हाण यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उदघाटन झाले. स्पर्धा खुला गट आणि ४० वर्षावरील गट अशा दोन गटात झाली. ४० वर्षावरील डबल गटात अॅड. विश्वास शिगवण आणि नरेश पेढांबकर विजेता ठरले. अभय काणेकर आणि वैभव जाधव यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. खुल्या डबल गटात मयूर कांबळे आणि सानिका सुतार यांनी विजेतेपद मिळवले. सौरभ सुतार आणि अनिश शिगवण यांनी उपविजेतेपद पटकावले. चिपळूण बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रणजित पाटील, सचिव अॅड. योगेश देसाई, सदस्य अॅड. विश्वास शिगवण, अलोरेचे उपसरपंच प्रमोद महाजन, चंदू ओसवाल, संजय महाडिक, संकेत सुवार आदींच्या उपस्थितीत विजेत्यांचा गौरव करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89356 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..