राजापूर-खरवेतेत सैनिकांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-खरवेतेत सैनिकांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
राजापूर-खरवेतेत सैनिकांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

राजापूर-खरवेतेत सैनिकांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

sakal_logo
By

-rat२२p२५.jpg
44914
ः राजापूर ः माजी सैनिक अनंत गुरव यांचा सत्कार करताना सरपंच दिनेश चौगुले आणि मान्यवर.
------------
खरवेतेत सैनिकांसह गुणवंतांचा गौरव

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २४ ः तालुक्यातील खरवते ग्रामपंचायतीच्या वतीने माजी सैनिकांसह कोरोना योद्धा, शिक्षण, शेती, क्रीडाक्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्‍या मान्यवरांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत त्यांच्या समाज जडणघडणीतील योगदानाचा गौरव केला. सरपंच दिनेश चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमामध्ये माजी सैनिक अनंत गुरव यांच्यासह अन्य मान्यवरांचा समावेश आहे.
गावातील उत्कर्ष माध्यमिक विद्यामंदिरच्या सभागृहामध्ये सरपंच चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला माजी सैनिक अनंत गुरव, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दयानंद चौगुले, श्री गांगेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ खरवतेचे अध्यक्ष नितीन गुरव, गावकर विठ्ठल चौगुले, महादेव चौगुले, देव माटल, विजय गुरव आदी उपस्थित होते.
भारतीय सैन्यदलामध्ये २८ वर्षे सेवा बजावलेले गावचे सुपुत्र अनंत गुरव, कुक्कुटपालन, गांडूळ खत प्रकल्प आदी कृषी व्यावसायिक क्षेत्रातील योगदानाबद्दल विजय पळसमकर, लाकडी घाण्यापासून तेलनिर्मिती व्यवसाय सुरू करणाऱ्‍या महिला उद्योजिका आर्या पळसमकर, शैक्षणिक क्षेत्रातील लक्षवेधी कामगिरीबद्दल रत्नागिरी येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे विजय गुरव, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल पूजा गुरसाळे, गावामध्ये उभारलेल्या आरोग्य उपकेंद्रासाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून देणारे श्रीकांत चौगुले यांच्या मातोश्री व भगिनी, गावामध्ये विधवा प्रथा बंद करण्यासाठी प्रोत्साहन देणारे गावप्रमुख, वाडीप्रमुख, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा निर्मितीसाठी तज्ञ म्हणून उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण, संस्था रत्नागिरी यांच्याकडून प्रमाणपत्र देऊन गौरवल्याबद्दल सुभाष सोकासणे, कोरोना महामारीमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्‍या व्यक्तींना कोरोना योद्धा म्हणून गौरवले. दहावीच्या परीक्षेमध्ये सुयश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89359 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..