खेड-कोकण रेल्वेमार्गावर मेमूच्या 32 फेऱ्या धावणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-कोकण रेल्वेमार्गावर मेमूच्या 32 फेऱ्या धावणार
खेड-कोकण रेल्वेमार्गावर मेमूच्या 32 फेऱ्या धावणार

खेड-कोकण रेल्वेमार्गावर मेमूच्या 32 फेऱ्या धावणार

sakal_logo
By

रेल्वे चित्र वापरा
....
कोकण रेल्वेमार्गावर मेमूच्या ३२ फेऱ्या

गणेशोत्सवासाठी नियोजन; ९० रुपयांत रोहा ते चिपळूणपर्यंत प्रवास
खेड, ता. २२ ः रोहा ते चिपळूण या मार्गावर पहिली मेमू ट्रेन शनिवारपासून (ता. २०) सुरू झाली आहे. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही गाडी खेड रेल्वेस्थानकात दाखल झाली तर दुपारी २.३० वा. पुन्हा दिव्याकडे मार्गस्थ झाली. गणेशभक्तांसाठी ही गाडी सुरू करण्यात आली असून एकूण ३२ फेऱ्या होणार आहेत. या गाडीमुळे चाकरमान्यांना अवघ्या ९० रुपयांत चिपळूणपर्यंत प्रवास करता येणार आहे.
दरवर्षी गणेशोत्सव, शिमगोत्सवामध्ये चिपळूण, खेडमधील प्रवाशांची मोठी गैरसोय होते. सिंधुदुर्ग, गोव्याकडून येणाऱ्या गाड्यांमध्ये चिपळूण, खेड स्थानकातील प्रवाशांना आतमध्ये शिरता येत नाही. ही गोष्ट लक्षात घेत या वर्षी दिवा-रोहा-चिपळूण मार्गावर मेमू रेल्वेगाडी सुरू करण्यात आली आहे. मध्यरेल्वेच्या माध्यमातून ही गाडी सोडण्यात आली आहे. गाडी क्र. ०११५७ चिपळूणपर्यंत येईल तर चिपळूण स्थानकातून १.४५ वा. ०११५८ क्रमांकाची गाडी रोहा-दिव्याच्या दिशेने जाईल. ही गाडी माणगाव, वीर, करंजाडी, विन्हेरे, खेड व चिपळूण अशी थांबेल. गणेशभक्तांच्या सोयीसाठी ही गाडी महत्त्वाची ठरणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89365 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..