कळसुली सरपंच निवड थेट जनतेमधून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळसुली सरपंच निवड थेट जनतेमधून घ्या
कळसुली सरपंच निवड थेट जनतेमधून घ्या

कळसुली सरपंच निवड थेट जनतेमधून घ्या

sakal_logo
By

kan२२२.jpg
४४९२४
कणकवली : येथील तहसीलदार रमेश पवार यांना कळसूली ग्रामस्थांनी निवेदन दिले.
------------
कळसुली सरपंच निवड
थेट जनतेमधून घ्या
ग्रामस्थांची जिल्हाधिकारी, तहसीलदारांकडे मागणी
कणकवली, ता. २२ : तालुक्यातील कळसुलीचे सरपंच पद हे थेट सरपंच नुसार नियुक्त करण्यात आले होते. मात्र नियमानुसार यापूर्वीच्या सरपंच अपात्र झाल्या त्यानंतर आता २५ ऑगस्ट रोजी सदस्यांमधून सरपंच निवडीची निवडणूक लावली आहे. परंतु महाराष्ट्र शासन अधिसूचना २७ जुलै नुसार रिक्त झालेल्या सरपंचाची निवडणूक ही ग्रामपंचायत अधिनियम कलम ४३ अन्वये थेट लोकांमधून होणे गरजेचे आहे. त्यामुळे २५ ऑगस्ट रोजी कळसुली ग्रामपंचायतची सरपंच पदाची सदस्यांमधून होणारी निवडणूक रद्द करून ती थेट जनतेतून घेण्यात यावी अशी मागणी कळसुली ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व कणकवली तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी आत्माराम नार्वेकर, दीपक मेस्त्री, संतोष दळवी, प्रवीण दळवी, अरुण दळवी, हेमंत वारंग, स्वप्निल गोसावी आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89367 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..