रत्नागिरी-19 हजार 654 शेतकऱ्यांची केवायसी अपूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-19 हजार 654 शेतकऱ्यांची केवायसी अपूर्ण
रत्नागिरी-19 हजार 654 शेतकऱ्यांची केवायसी अपूर्ण

रत्नागिरी-19 हजार 654 शेतकऱ्यांची केवायसी अपूर्ण

sakal_logo
By

पी. एम. किसान निधी----लोगो
..
केवायसी पूर्ण न झाल्यास लाभाला वंचित

रत्नागिरी तालुक्यात १९, ६५४ शेतकऱ्यांची केवायसी अपूर्ण; ३ कोटी ९३ लाख रुपये अडकणार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ ः पी. एम. किसान निधी योजनेंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील १९ हजार ६५४ शेतकऱ्‍यांनी ई केवायसी केलेली नाही. त्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत ई केवायसी केली नाही, तर त्यांना पुढील लाभ दिले जाणार नाहीत, असा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या पी एम किसान सन्मान योजनेतून शेतकर्‍यांना वर्षाला ६००० रुपये मिळत आहेत. या योजनेतून लाभार्थ्यांना अकरा हप्ते मिळाले आहेत. पी. एम. किसान लाभार्थी यांच्या माहितीत काही त्रुटी असल्याने केंद्र शासनाने लाभार्थींना ई केवायसी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. केंद्र शासनाने ई केवायसी करण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत ठेवली होती. पण अद्यापही सर्व लाभार्थ्यांनी ई केवायसी न केल्याने आता ३१ ऑगस्ट ही ई केवायसी करण्याची अंतिम तारीख निश्चित केली आहे. जे लाभार्थी ई केवायसी करणार नाहीत, त्यांना या योजनेचा १२ वा हप्ता मिळणार नाही. रत्नागिरी तालुक्यात पी. एम. किसानचे आधार पडताळणी झालेले २९ हजार ६५० लाभार्थी आहेत. त्यापैकी ८ हजार ३७८ लाभार्थींनी ई केवायसी केली. फक्त २८ टक्के लाभार्थ्यांनी ई केवायसी पूर्ण केले आहे. अद्यापही १९ हजार ६५४ लाभार्थी म्हणजेच ७२ टक्के काम पूर्ण करावयाचे आहे. या लाभार्थीनी ३१ ऑगस्टपर्यंत ई केवायसी न केल्यास यांना पुढील लाभ दिला जाणार नाही. तालुक्यातील शेतकऱ्‍यांना ३ कोटी ९३ लाख रुपये मिळणार नाहीत. ई केवायसी केली नसलेल्या शेतकऱ्‍यांनी त्यांची यादी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांना गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांच्यामार्फत तालुक्यातील सर्व सरपंच यांना ई-मेलने पाठवण्यात आली आहे. या शिवाय तालुक्यातील सर्व महा ई सेवा केंद्र चालकांकडेही यादी पाठवण्यात आली आहे.
---
कोट
पी. एम. किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी जवळच्या महा ई सेवा केंद्रात आधार कार्ड व मोबाईल घेऊन ई केवायसी करु घेऊन शकतात. या शिवाय स्वत: शेतकरी सुद्धा आपल्या मोबाईलवर ई केवायसी करु शकतात.
- शशिकांत जाधव, तहसीलदार
---
चौकट
मोबाईलवरुन करावयाचे टप्पे असे..
पायरी १- शेतकऱ्‍यांनी सर्वप्रथम मोबाईलच्या गुगल क्रोममध्ये www.pmkisan.gov.in ही साईट ओपन करून त्यावरील ई केवायसी या बटन दाबावे. त्यात लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक टाकून सर्च बटनावर क्लिक करावे. पायरी २- आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर टाका. त्यानंतर मोबाईलवर चार अंकी ओटीपी येईल, तो तिथे टाका. पायरी ३- पुढे Authentification हे बटन दाबा. त्यानंतर पुन्हा सहा अंकी ओटीपी येईल. तो भरुन सबमिट बटन दाबा. ही पूर्ण प्रक्रिया योग्यप्रकारे पूर्ण केली तर केवायसी पूर्ण होईल.
..
ग्राफ करावा
एक नजर..
रत्नागिरी तालुक्यातील लाभार्थी ः
आधार पडताळणी झालेले लाभार्थीः २९ हजार ६५०
त्यापैकी लाभार्थींनी ई केवायसी केलीः ८ हजार ३७८
अद्यापही काम पूर्ण व्हायचे असे लाभार्थीः १९ हजार ६५४

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89370 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..