संस्कृत भारतीतर्फे संस्कृत दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संस्कृत भारतीतर्फे संस्कृत दिन
संस्कृत भारतीतर्फे संस्कृत दिन

संस्कृत भारतीतर्फे संस्कृत दिन

sakal_logo
By

संस्कृत भारतीतर्फे संस्कृत दिन
रत्नागिरी : संस्कृत भारतीच्या रत्नागिरी नगर विभागाचा संस्कृत दिनाचा कार्यक्रम रविवारी गंगाधर गोविंद पटवर्धन विद्यालयात साजरा करण्यात आला. याप्रसंगी भारतीय तत्त्वज्ञानाची आवड असलेले ज्येष्ठ अभ्यासक व संस्कृत प्रेमी श्रीकांत रांगणेकर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी अनेक पुस्तकातील संस्कृत संबंधातील दाखले देत संस्कृत भाषेचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाला कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्रातील सहाय्यक प्राध्यापक अविनाश चव्हाण मुख्य वक्ते म्हणून लाभले. त्यांनी संस्कृत भाषेचे महत्व सांगत संस्कृतमधील आधुनिक काळातील संधींची ओळख करून दिली. या वेळी संस्कृत भारतीच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षा डॉ. कल्पना आठल्ये व्यासपीठावर उपस्थित होत्या. संस्कृत दिनाचे औचित्य साधून विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. प्रास्ताविक तेजश्री जोशी हिने केले.
-------------
देव, घैसास, कीरमध्ये वृक्षारोपण
रत्नागिरी : देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. महाविद्यालयाच्या परिसरात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. वृक्षारोपण कार्यक्रमाला भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह सुनिल वणजू, प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील, राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख हरेश केळकर, ऋतुजा भोवड, दीप्ती कदम, मिथिला वाडेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाला ४० विद्यार्थी उपस्थित होते.
----------
डीजीके कॉलेजमध्ये
भित्तीपत्रक विभागाचे उद्घाटन
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात भित्तीपत्रक एक युवा विचार विभागाचे उद्घाटन प्रमुख अतिथी बशीर मुर्तुझा यांच्या हस्ते करण्यात आले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या विषयावर मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत विद्यार्थ्यांनी लिहिलेले साहित्य, चित्रे, रेखाटने यांचा भित्तीपत्रकात समावेश होता. संस्थेचे उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे, कार्यवाह सुनील वणजू, सहकार्यवाह संजय जोशी, खजिनदार नचिकेत जोशी, चंद्रकांत घवाळी, संस्थेचे विश्वस्त शेखर करंदीकर, डॉ. चंद्रशेखर केळकर, सदस्य राजेंद्र कदम, शाळेचे माजी विद्यार्थी नितीन ठाकूर, प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, भित्तीपत्रक विभागप्रमुख राखी साळगावकर, मराठी विभागप्रमुख अनन्या धुंदूर, हिंदी विभागप्रमुख कस्तुरी मोहित, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89379 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..