राजापूर-गणेशोत्सवापूर्वी महामार्गाची डागडुजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-गणेशोत्सवापूर्वी महामार्गाची डागडुजी
राजापूर-गणेशोत्सवापूर्वी महामार्गाची डागडुजी

राजापूर-गणेशोत्सवापूर्वी महामार्गाची डागडुजी

sakal_logo
By

गणेशोत्सवापूर्वी महामार्गाची होणार डागडुजी

राजापूर, ता. 22 ः मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडलेले असून रस्त्यामध्ये सद्यःस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. त्यामुळे खड्डेमय रस्त्यातून वाहने चालवताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. महामार्गाच्या या दयनीय स्थितीकडे आमदार राजन साळवी यांनी राज्याच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनाचे लक्ष वेधले. त्याची तत्काळ दखल घेऊन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज आढावा बैठक घेतली. या वेळी त्यांनी गणेशोत्सवापूर्वी रस्त्याची डागडुजी करण्याचे आश्‍वासित केले. सह्याद्री अतिथीगृहावर महामार्गासंबंधित झालेल्या या बैठकीला खासदार विनायक राऊत, खासदार सुनील तटकरे, आमदार प्रवीण दरेकर, राजन साळवी, शेखर निकम, योगेश कदम, वैभव नाईक, रवी पाटील, भरत गोगावले, आदिती तटकरे, अनिल तटकरे, बाळाराम पाटील, राजन तेली, भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक पटर्वधन आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89383 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..