रत्नागिरी ः गुन्हेगारीच्या विळख्यात तरुण पिढी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः गुन्हेगारीच्या विळख्यात तरुण पिढी
रत्नागिरी ः गुन्हेगारीच्या विळख्यात तरुण पिढी

रत्नागिरी ः गुन्हेगारीच्या विळख्यात तरुण पिढी

sakal_logo
By

टु १
....
रत्नागिरी कारागृह--लोगो
...
45115 ः संग्रहीत
...
फोटो काल सोडला
L44993 ः संग्रहीत
.............
खतपाणी गुन्हेगारीला; तरूणाई वाम मार्गाला!

२० ते ४५ वयोगटातील कैदी जास्त; गंभीर गुन्ह्यातील २०० कैदी,
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ ः जिल्ह्यातील तरुण पिढी गुन्हेगारीच्या विळख्यात गुरफटत असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. बलात्कार, दरोडा, चोरी, खून, मारामारी आदी गुन्ह्यांमुळे शिक्षा भोगणारे जिल्हा कारागृहात २०० कैद्यांमध्ये २० ते ४५ वयोगाटातील सर्वांत जास्त कैदी आहेत. यावरून तरुण पिढी बेकारी, व्यसनाधीन आणि झटपट पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी गुन्हेगारी क्षेत्राकडे ओढली जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
रत्नागिरीतील विशेष कारागृहात जिल्ह्यातील कैद्यांची संख्या अधिक आहे. त्याचप्रमाणे हे विशेष कारागृह असल्याने प्रशासकीय कारणास्तव वर्ग करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यातील कैद्याला या कारागृहात पाठवले जाते. या कारागृहाची क्षमता २४५ इतकी आहे. सध्या कारागृहात २०० कैदी असून हे सर्व जिल्ह्यातील विविध आरोपांखाली शिक्षा झालेले कैदी आहेत. या कैद्यांमध्ये २० ते ४५ या वयोगटातील कैद्यांची संख्या जास्त आहे. खून, मारामारी, विनयभंग, बलात्कार आदी गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेल्यांची यात संख्या अधिक आहे. ४५ ते ५९ वयोगटातील कैद्यांची संख्या त्या खालोखाल आहे. ६० वर्षावरील ३ कैदी आहेत.
----------------
चौकट
कोणत्या वयोगटातील किती कैदी
कैदी*वयोगट
१४४*२० ते ४५
१००*३० ते ४५
५०*४६ ते ५९
०६*६० पेक्षा जास्त
----------------------------
कोट...
रत्नागिरीतील विशेष कारागृहात २०, ४५ या वयोगटातील कैद्यांची संख्या अधिक आहे. बलात्कार, दरोडा, चोरी, खून आदी गुन्ह्यांमुळे शिक्षा झालेले २०० कैदी रत्नागिरीतील विशेष कारागृहात सध्या शिक्षा भोगत आहेत. हे सर्व कैदी रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत.
-अमेय पोतदार, सहाय्यक कारागृह अधीक्षक, रत्नागिरी
..
चौकट
वाढती बेकारी, इर्षा...
गुन्हेगारी क्षेत्रात ३० वर्षांच्या आतील गुन्हेगारांची संख्या वाढत असल्याने ही चिंतेची बाब आहे. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही वर्षापासून बेकारी वाढू लागली आहे. कोरोना काळात त्यात अधिक भर पडली आहे. वाढती बेकारी आणि आत्मसन्मानाला धक्का लागणे, इर्षा आदी कारणे याला कारणीभूत असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89389 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..