चिपळूण ः कोळकेवाडी धरणातून टँपिंगला मंजुरी द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः कोळकेवाडी धरणातून टँपिंगला मंजुरी द्या
चिपळूण ः कोळकेवाडी धरणातून टँपिंगला मंजुरी द्या

चिपळूण ः कोळकेवाडी धरणातून टँपिंगला मंजुरी द्या

sakal_logo
By

कोळकेवाडी धरणातून टँपिंगला मंजुरी द्या

आमदार निकम; ३० गावांना दिलासा देण्याचे मंत्र्यांचे आश्वासन
चिपळूण, ता. २२ ः तालुक्यातील पूर्व विभागातील टंचाईग्रस्त असलेल्या ३० गावांना कोळकेवाडी धरणास टॅपिंग करून थेट ग्रॅव्हिटीद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. या योजनांचे सर्व्हेक्षणदेखील झाले आहे. यातील कोळकेवाडी, दादर वालोटी ग्रॅव्हिटी पाणी योजनेस प्रशासकीय मान्यता आहे. या योजनेची निविदा प्रक्रियादेखील पूर्णत्वास गेली. केवळ कोळकेवाडी धरणातील टॅपिंगला मंजुरी नसल्याने या योजना रखडल्या आहेत. त्यास मंजुरी देण्याची मागणी आमदार शेखर निकम यांनी पावसाळी अधिवेशनात केली. टॅपिंगसंदर्भात कार्यवाही सुरू असून पाणीटंचाई दूर करू, असे आश्वासन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
अधिवेशनात पाणी योजनांचा मुद्दा उपस्थित करताना आमदार शेखर निकम म्हणाले, नांदिवसे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना बंद झाल्यानंतर गेल्या ५ वर्षापासून ओवळी, कळकवणे, वालोटी, दादर गावास पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. या भागात पाणी योजनेचे मजबूत स्त्रोत नाहीत. त्यामुळे कोळकेवाडी धरणातील ग्रॅव्हिटीद्वारे १२ कोटी ८१ लाख खर्चाची पाणी योजना मंजूर करण्यात आली. याशिवाय अडरे, अनारी, पाणीटंचाई असलेल्या २५ गावांसाठी देखील ग्रॅव्हिटी पाणी योजना प्रस्तावित आहेत. या योजनांचे तांत्रिक सर्व्हेक्षण झाले असून लवकरच त्यास प्रशासकीय मान्यता मिळेल. थेट कोळकेवाडी धरणातून टॅपिंगद्वारे पाणी उचलण्यात येणार असल्याने पाणीपुरवठा योजनांना लाखो रुपयाचे वीजबिल भरावे लागणार नाही. टंचाईग्रस्त गावांना त्याचा दिलासा मिळणार आहे.
...
चौकट
टॅपिंगबाबत धोरण ठरवण्यासाठी कार्यवाही..
जलविद्युत प्रकल्प स्तर -४ चे इव्हिटी नं. ४ कोळकेवाडी येथून ग्रॅव्हिटीने योजना करण्याकरिता जलजीवन मिशन वार्षिक कृती आराखडा तयार आहे. यावर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, टॅपिंगबाबत संपूर्ण महाराष्ट्रभर धोरण ठरवण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. लवकरच त्यास मंजुरी दिली जाईल. टंचाईग्रस्त गावांना दिलासा देऊ, असे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89390 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..