लांजा-रावारीतील प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा-रावारीतील प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या
लांजा-रावारीतील प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

लांजा-रावारीतील प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

sakal_logo
By

-rat२२p३०.jpg
44945
- प्रसन्न दीक्षित
-----------
रावारीतील भाजप पदाधिकाऱ्‍याची आत्महत्या

दहा दिवस होते बेपत्ता; बापेरेतील जंगलात मृतदेह आढळला

सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. २२ ः भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रसन्न रामकृष्ण दीक्षित (५०) यांचा जंगलात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. ते १२ ऑगस्टपासून बेपत्ता होते. तालुक्यातील रावारी-ब्राह्मणवाडी येथील रहिवाशी असलेले प्रसन्न दीक्षित हे भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी होते. गावातील, समाजातील, घर कुटुंबातील वाद मिटवणे, सोडवणे यात ते अग्रेसर होते. राष्टीय स्वयंसेवक संघाचे ते पदाधिकारी असल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुषमा स्वराज, सुरेश प्रभू आदींसह अनेक नेत्यांशी थेट संवाद होता. याशिवाय भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष, कोकण कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण परिषदचे सदस्य होते. याशिवाय लांजातील अनेक संस्थांमध्ये कार्यरत होते.
घरगुती भांडणातून १२ ऑगस्टपासून ते बेपत्ता झाले होते. त्यानंतर नातेवाईक आणि गावकऱ्यांनी शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा लागला नव्हता. तब्बल दहा दिवसानंतर सोमवारी (ता. २२) गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह रावारी आणि बापेरे गावच्या सीमेलगत असलेल्या जंगलात आढळला. ही आत्महत्याच असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शवविच्छेदन डॉ. महाडीक यांनी केले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.
--------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89400 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..