पिंगुळीतील दहीहंडीचा नेरूर कुलदेवता मानकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंगुळीतील दहीहंडीचा नेरूर कुलदेवता मानकरी
पिंगुळीतील दहीहंडीचा नेरूर कुलदेवता मानकरी

पिंगुळीतील दहीहंडीचा नेरूर कुलदेवता मानकरी

sakal_logo
By

swt२२२३.jpg
44948
पिंगुळी ः येथील पाच थरांची दहीहंडी नेरूर गोविंदा पथकाने फोडली. (छायाचित्र ः अजय सावंत)

पिंगुळीतील दहीहंडीचा
नेरूर कुलदेवता मानकरी
पाच थरांची सलामी ः विविध नृत्याविष्कार, आकर्षक रोषणाई ठरली लक्षवेधी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २० ः साई कला-क्रीडा मंडळ पिंगुळी पुरस्कृत आणि दहीहंडी मित्र मंडळ पिंगुळी यांच्या वतीने पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे भव्य दहीहंडी महोत्सव २०२२ चे आयोजन केले होते. पाच थरांची दहीहंडी फोडण्याचा मान कुलदेवता नेरूर गोविंदा पथकाने मिळविला.
या दहीहंडी उत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. विधीतज्ज्ञ संग्राम देसाई, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजित देसाई, विकास कुडाळकर, विजय दळवी, अविनाश वालावलकर, गंगाराम सडवेलकर, साईराज जाधव, मंगेश चव्हाण, दीपक गावडे, बाबल गावडे, अजय आकेरकर, राजन पांचाळ, अमित तेंडुलकर, ग्रामपंचायत सदस्य दिव्या गावङे, प्रिया पांचाळ, सतीश माडये, साधना माडये, प्रथमेश तेजम, सिध्देश माणगावकर, रोहन परब, संजू परब, महेंद्र माळगावकर, आबा चव्हाण, अमित चव्हाण, राघोबा धुरी, मयूर लाङ, चेतन राऊळ, कपिल म्हापसेकर, प्रसन्नजित दळवी, साई दळवी, मुन्ना दळवी, सुंदर गावडे, शेखर पिंगुळकर, राकेश गावडे, गणेश पेडणेकर, संतोष गावङे, तुळशीदास पाटकर, राजन सडवेलकर उपस्थित होते.
यावेळी गामपंचायतीच्या वतीने धीरज परब, प्रदीप माने, ममता धुरी, चंदन कांबळी, कुडाळ नगरपंचायत नगरसेविका चांदणी कांबळी, पिंगुळी व्यापारी संघटना अध्यक्ष सुनील म्हापसेकर, सल्लागार सुनील कुडाळकर यांचा सत्कार करण्यात आला. पिंगुळी गावची सात थरांची मानाची दहीहंडी फोडणाऱ्या संघास २१ हजार रुपये व आकर्षक चषक असे बक्षीस होते; मात्र सात थर कोणी रचले नाहीत. नेरूर, वाफोली, सावंतवाडी, वेतोरे, वेताळबांबर्डे, ओमसाई पिंगुळी बालचमू असे गोविंदा पथक सहभागी झाले होते. डीजेच्या तालावर विविध नृत्याविष्कार, आकर्षक रोषणाई, पाण्याची बरसात या विविध आकर्षणांसह आयोजित करण्यात येत असलेल्या दहीहंडी कार्यक्रमास पिंगुळीवासीयांनी भरघोस प्रतिसाद दिला. निवेदन शैलेश जाधव व शेखर दळवी यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89404 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..