रत्नागिरी-स्वा. सावरकर नाट्यगृहाची वीज तोडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-स्वा. सावरकर नाट्यगृहाची वीज तोडली
रत्नागिरी-स्वा. सावरकर नाट्यगृहाची वीज तोडली

रत्नागिरी-स्वा. सावरकर नाट्यगृहाची वीज तोडली

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat22p33.jpg
-४४९५३
स्वा. सावरकर नाट्यगृह

स्वा. सावरकर नाट्यगृहाची वीज तोडली

महावितरणची पालिकेला नोटीस; एक लाख भरल्यावर जोडणी पूर्ववत, पथदिव्यांचेही लाखोंचे बिल थकीत

रत्नागिरी, ता. २१ : वीज बिल थकल्याने स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहाचे वीज कनेक्शन महावितरण कंपनीने तोडून पालिकेला दणका दिला. त्यामुळे सावरकर नाट्यगृह अंधारात आहे; मात्र पालिकेने तातडीने एक लाख बिल भरल्यानंतर पुन्हा वीज जोडण्यात आली; मात्र शहरातील पथदिव्यांचेही ३५ ते ४० लाखांचे वीज बिल थकीत आहे. त्याबाबतही पालिकेला महावितरण कंपनीने नोटीस बजावली आहे. हे बिल पालिकेने वेळेत न भरल्यास शहरातील मुख्य, अंतर्गत रस्ते आणि फूटपाथ अंधारात जाण्याची भीती आहे.
स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह रत्नागिरी पालिकेच्या मालकीचे आहे. यापूर्वी नाट्यगृह अनेक विषयांनी गाजले. पालिकेने नाट्यगृहाचे एक लाखाचे बिल थकीत ठेवले. थकीत बिलाने मेटाकुटीस आलेल्या महावितरणने अखेर सावरकर नाट्यगृहाची वीज जोडणी तोडली. वीजपुरवठा सुरू नसल्याबाबत नाट्यगृहातील कर्मचाऱ्यांनी महावितरणशी संपर्क साधला. तेव्हा त्यांना वीज बिल न भरल्याने जोडणी तोडल्याचे सांगण्यात आले. सोमवारी (ता. २२) पालिकेत धावाधाव सुरू झाली. नाट्यगृहातील गैरसोयीने कलाकार आणि रसिक प्रेक्षक त्रस्त असताना आता तर नगरपालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नाट्यगृह अंधारात गेले. प्रशासनाने धावपळ करत अखेर एक लाख रुपयाचे थकीत बिल भरल्यानंतर महावितरणने नाट्यगृहाचा जोडणी पुन्हा जोडली.
शहरातील पथदिव्यांचाही विषय गंभीर आहे. महावितरणने पथदिव्यांचे बिल न भरल्याने पालिकेला नोटीस बजावली आहे. सुमारे ३५ ते ४० लाखांची ही थकबाकी आहे. वेळेवर हे बिल न भरल्यास शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांसह फूटपाथ अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89415 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..