रत्नागिरी-क्राईम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-क्राईम
रत्नागिरी-क्राईम

रत्नागिरी-क्राईम

sakal_logo
By

मिरजोळे येथे हातभट्टीवर कारवाई
रत्नागिरी ः शहराजवळील मिरजोळे-पाटीलवाडी येथे विनापरवाना गावठी हातभट्टीवर दारू अड्ड्यावर शहर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत १० हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सचिन दिगंबर मालवणकर (वय ५१, रा. कुवारबाव, रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २०) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. शहर पोलिसांना मिरजोळे येथे गावठी हातभट्टी चालवण्यात येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत १५ लिटर दारू, ४०० लिटर गूळ नवसागर मिश्रित कुजके रसायन आणि इतर साहित्य असा एकूण १० हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अधिक तपास पोलिस हवालदार रूपेश भिसे करत आहेत.
------
जयगडला तरुण मृतावस्थेत आढळला
रत्नागिरी ः तालुक्यातील जयगड आंग्रेपोर्ट येथील समुद्राच्या अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला असून जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (ता. २१) सकाळी पावणेनऊच्या सुमारास निदर्शनास आली. या प्रकरणी तेथील पर्यवेक्षक प्रवीण तिवारी यांनी जयगड पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यांना रविवारी सकाळी जयगड आंग्रेपोर्ट येथील समुद्राच्या पाण्यात एका तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. त्यांनी तत्काळ याची माहिती जयगड पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. मृत तरुणाचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षाचे असून काळा शर्ट आणि निळ्या रंगाची बर्मुडा परिधान केली आहे. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल गावीत करत आहेत.
-------
उलटलेल्या नौकेतील तरुण अद्यापही बेपत्ता
रत्नागिरी ः मांडवी किनारी बंदराच्या मुखाशी भरलेल्या गाळामुळे राजिवडा येथील मासेमारी नौका रविवारी (ता. २१) सकाळी दहा वाजता बुडाली. यातील एक खलाशी बेपत्ता झाला तर चौघांना वाचवण्यात यश आले होते. ओवेशी अजूम मखी (वय २१, रा. जयगड) असे बेपत्ता खलाशाचे नाव आहे. माडंवी खाडीमुखाशी उलटलेली नौका सुरूबनासमोर किनाऱ्याला लागली असून बुडालेला खलाशी आत सापडेल या आशेने ही नौका वर ओढण्याचे काम करण्यात आले; मात्र या नौकेत बेपत्ता तरुण अद्यापही सापडला नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89416 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..