वीज बिले जाळून मालवणात आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीज बिले जाळून मालवणात आंदोलन
वीज बिले जाळून मालवणात आंदोलन

वीज बिले जाळून मालवणात आंदोलन

sakal_logo
By

swt2228.jpg
44967
मालवणः महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात काँग्रेसच्यावतीने वाढीव वीज बिले जाळून निषेध आंदोलन करण्यात आले.

वीज बिले जाळून मालवणात आंदोलन
राष्ट्रीय काँग्रेस आक्रमकः विविध घोषणा, लूट करत असल्याचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २२ः वीज युनिट दर कमी करा, नायतर खुर्च्या खाली करा, या सरकारच करायचे काय? खाली डोकं वर पाय, एसीमध्ये बसून सामान्य जनतेला घाम फोडणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध असो, अशा घोषणा देत आज मालवणात राष्ट्रीय काँग्रेसकडून भरमसाठ वीज बिलांच्या विरोधात महावितरण कार्यालयासमोर वीज बिले जाळून निषेध आंदोलन करण्यात आले.
महावितरण कंपनी नागरिकांची वाढीव बिल देऊन लूट करत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी करत पितृपंधरवड्यात वीज अधिकारी व वीज विभागाचे मंत्री यांच्या नावाने वीज कार्यालयाच्या आवारात श्राद्ध घालण्यात येईल, असा इशारा दिला. भरमसाठ वीज बिले व वीज समस्यांबाबत वीज अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याबाबत आज राष्ट्रीय काँग्रेसतर्फे महावितरणच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी वीज बिले जाळून व घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, अरविंद मोंडकर, बाळु अंधारी, श्रीकृष्ण तळवडेकर, देवानंद लुडबे, महिला तालुकाध्यक्ष ममता तळगावकर, जेम्स फर्नांडिस, सरदार ताजर, अमृत राऊळ, पल्लवी तारी- खानोलकर, गणेश पाडगावकर, श्रेयस माणगावकर, लक्ष्मीकांत परुळेकर, बाबा मेंडिस, योगेश्वर कुर्ले, केदार केळुसकर, मयूर तळगावकर, श्रीहरी खवणेकर, ऐश्वर्या काळसेकर उपस्थित होते.
यावेळी अरविंद मोंडकर म्हणाले, ‘‘शंभर-दोनशे रुपयांपर्यंतची विजे बिले थकीत राहिली असली तरीही त्यानंतर येणारी बिले ही अवाच्या-सवा काही हजारात वाढून येत आहेत. वीज युनिटचे दर वाढले असून वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्या व कनेक्शनमध्येही तांत्रिक दोष निर्माण होत असल्याने वीज मीटरवर जास्त युनिट पडत असल्याने बिले जास्त येत आहेत. वीज वाहिन्या व ट्रान्सफॉर्मर यांच्याबाबत योग्य दखल न घेतल्याने वीज कर्मचाऱ्यांच्या चुकांमुळे मीटरमध्ये येणारी वीज ही वारंवार कमी जास्त प्रमाणात येत असून त्याच्या लोडमुळे अनेक घरांमधील विद्युत उपकरण देखील खराब झाली आहेत. परिणामी नागरिकांना वर्षाला लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. मीटर रिडींग घेणाऱ्या कंपन्यांच्या चुकांमुळे देखील ही बिले वाढलेली येत आहेत. प्रामाणिकपणे सामान्य जनता बिल भरत असतानाही महावितरणाच्या गलथान कारभारामुळे लोकांना बिल भरताना घाम फुटत आहे. याबाबत वेळोवेळी वीज अधिकाऱ्यांचे लक्ष वेधुनही कोणतीही कार्यवाही झाली नाही. अधिकारी कोणत्याही प्रकारे नागरिकांना सहकार्य न करता घरोघरी जाऊन मीटर कट करत आहेत.’’
महावितरणचे अधिकारी जाग्यावर नसतात, तक्रारीचा फोन उचलला जात नाही. तक्रारींकडे लक्ष न देता अधिकारी जाणून बुजून वितरण कंपनीला मोठ्या प्रमाणात मोबदला मिळवून देण्यात मग्न असल्याने आज काँग्रेसतर्फे वाढीव वीज बिले जाळून शासनाचा निषेध करण्यात आला, असे मोंडकर यांनी सांगितले. शासनाने वीज दर कमी करावा तसेच भरमसाठ बिलातून ग्राहकांना सूट द्यावी, अशी मागणी यावेळी मोंडकर यांनी केली.

चौकट
...अन्यथा ग्राहक मंचाकडे तक्रार
गणेशोत्सव जवळ आला असून यावेळी कोणत्याही नागरिकाचे विज कनेक्शन तोडण्यात आले तर गणेशोत्सव नंतर या ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी घेण्यासाठी काँग्रेसकडून दोन दिवशीय शिबिर आयोजित करणार येणार आहे. या शिबिरामध्ये वितरण कंपनीने नागरिकांना त्रास दिल्यास त्याबाबत येणाऱ्या तक्रारींनुसार अधिकारी व कंपनी विरोधात ग्राहक मंचाकडे देखील तक्रार करणार असल्याचा इशारा मोंडकर यांनी दिला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89424 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..