सं १ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सं १
सं १

सं १

sakal_logo
By

माने इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये
रंगणार युवा महोत्सव
रत्नागिरी ः ५५ व्या आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धांचा दक्षिण रत्नागिरी विभागाचा युवा महोत्सव आंबव (ता. संगमेश्वर) येथील राजेंद्र माने इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होणार आहे. नाट्य, नृत्य, वाङमय, ललित कला आणि संगीत विभागातील स्पर्धा युवा महोत्सव होणार आहे. नागपूर विद्यापीठाचे माजी विद्यार्थी विकास संचालक डॉ. अरुण पाटील महोत्सवासाठी विशेष अतिथी म्हणून येणार आहेत. महाविद्यालयाचे संस्थापक तथा माजी मंत्री रविंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य महेश भागवत आणि सांस्कृतिक समन्वयक प्रा. गणेश जागुष्टे महोत्सवासाठी मेहनत घेत आहेत. जिल्हा समन्वयक डॉ. आनंद आंबेकर, सहसमन्वयक प्रा. राहुल कोतवडेकर दोन्ही विभागातील महाविद्यालयामध्ये संपर्क साधत आहेत. विभागात यशस्वी झालेले कलाप्रकार गणपती सुट्टीनंतर मुंबईमध्ये होणाऱ्या अंतिम स्पर्धेसाठी जाणार आहेत. सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, पालकांनी कौशल्य विकासाच्या उद्देशाने युवा महोत्सवांमध्ये सकारात्मकदृष्टीने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा समन्वयक डॉ. आनंद आंबेकर यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89468 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..