जातीय अत्याचार विरोधात कणकवलीत संताप व्यक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जातीय अत्याचार विरोधात 
कणकवलीत संताप व्यक्त
जातीय अत्याचार विरोधात कणकवलीत संताप व्यक्त

जातीय अत्याचार विरोधात कणकवलीत संताप व्यक्त

sakal_logo
By

45015
कणकवली : येथील म्‍हाळसाबाई भांडारकर ट्रस्ट सभागृहात विविध समाज संघटनांची झालेली बैठक.

जातीय अत्याचार विरोधात
कणकवलीत संताप व्यक्त

सप्टेंबरमध्ये मोर्चाचा संघटनांचा इशारा

कणकवली, ता.२३ : राजस्थान जालोर येथील आठ वर्षीय मुलाचा शिक्षकाच्या मारहाणीत मृत्‍यू झाला. तसेच देशभरात घडणाऱ्या जातीय अत्‍याचाराच्या घटनांचा निषेध करण्यासाठी १५ सप्टेंबरला जिल्‍हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला जाणार आहे. याबाबतचा निर्णय कणकवली येथील बैठकीत घेण्यात आला.
येथील म्‍हाळसाबाई भांडारकर ट्रस्टच्या सभागृहात वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकाराने वेगवेगळ्या सामाजिक, धार्मिक संघटनांची बैठक झाली. या बैठकीत राजस्थान जालोर येथील प्रकरणाचे पडसाद उमटले. देशभरात- राज्यभरात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडणाऱ्या जातीय अत्याचाराच्या घटनांचा यावेळी निषेध करण्यात आला. वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग, सत्यशोधक सेक्युलर फ्रंट महाराष्ट्र, भारतीय बौद्ध महासभा, मुक्ती संघर्ष समिती, सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार उन्नती मंडळ, संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था महाराष्ट्र, जिल्ह्यातील कास्ट्राईब संघटनेचे विविध विभागाचे अध्यक्ष आणि अनुसूचित जाती-जमाती सिंधुदुर्ग जिल्हा संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे अध्यक्षस्थानी जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर होते. सत्यशोधक सेक्युलर फ्रंट महाराष्ट्र- निमंत्रक ॲड. सुदीप कांबळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी चर्मकार उन्नती मंडळ जिल्हाध्यक्ष - सुजित जाधव, कास्ट्राईब जिल्हाध्यक्ष समाज भूषण संदीप कदम, वंचित बहुजन आघाडी महासचिव प्रमोद कासले, युवा आघाडी अध्यक्ष रोहन कदम, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कदम, भारतीय बौद्ध महासभा कणकवली तालुका महासचिव जनी कुमार कांबळे, कोषाध्यक्ष सुभाष जाधव, मुक्ती संघर्ष समिती अध्यक्ष संग्राम सावंत आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89527 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..