रानबांबुळीत युवकांचे रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रानबांबुळीत युवकांचे रक्तदान
रानबांबुळीत युवकांचे रक्तदान

रानबांबुळीत युवकांचे रक्तदान

sakal_logo
By

45044
रानबांबुळी ः रक्तदात्यांना प्रमाणपत्र देताना छत्रपती युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

रानबांबुळीत युवकांचे रक्तदान
ओरोस ः रानबांबुळी येथील छत्रपती युवा प्रतिष्ठानतर्फे सोमवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रवळनाथ मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजन केले होते. शिबिरात युवकांसह युवती आणि महिलांचाही मोठा सहभाग होता. यावेळी ज्येष्ठ नागरिक बाबूराव परब, परशुराम परब, सरपंच वसंत बांबूळकर, उपसरपंच सतीश परब, डॉ. वैभव आईर, भाई गावडे, प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते. मंडळाचे पदाधिकारी शुभम परब, प्रसाद गावडे, अक्षय परब, अमेय खंदारे, वैभव परब, अमोल ठाकूर, भास्कर मराठे, सर्वेश परब आणि सहकारी मंडळींनी शिबिर यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.
.....................
शिवसेनेतर्फे देवदर्शन यात्रा
कणकवली ः शिवसेना विभाग खारेपाटण, खारेपाटणचे सुपुत्र तथा डोंबिवली येथील उद्योजक रुपेश सावंत व शिवसेना महिला आघाडीच्या मनस्वी कोळसुलकर यांच्या संयुक्त आयोजनाने खारेपाटण पंचक्रोशीतील महिलांना श्रावण सोमवारनिमित्त मोफत मार्लेश्वर, महाकाली, धुतपापेश्वर व गणपतीपुळे देवदर्शन यात्रेचे आयोजन केले होते. त्याचा प्रारंभ युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते झाला. यावेळी रुपेश सावंत, मनस्वी कोळसुलकर, आस्था पाटणकर, शिवसेना तालुका उपप्रमुख महेश कोळसुलकर, खारेपाटण विभाग उपप्रमुख शिवाजी राऊत, शाखाप्रमुख गिरीश पाटणकर, दिगंबर गुरव, भूषण कोळसुलकर, आदिनाथ शेट्ये, युवासेना तालुका समन्वयक तेजस तालुका उपप्रमुख राणे, तेजस राऊत, विभागप्रमुख बबन मुणगेकर, संकेत लोकरे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89551 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..