अर्बन बँकतर्फे लवकरच क्यूआर, एसएमएस सुविधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्बन बँकतर्फे लवकरच क्यूआर, एसएमएस सुविधा
अर्बन बँकतर्फे लवकरच क्यूआर, एसएमएस सुविधा

अर्बन बँकतर्फे लवकरच क्यूआर, एसएमएस सुविधा

sakal_logo
By

swt२३५.jpg
४५०५०
सावंतवाडीः अर्बन बँकेच्या वार्षिक सभेत अध्यक्ष अँड सुभाष पणदूरकर व संचालक मंडळ.


अर्बन बँकतर्फे लवकरच
क्यूआर, एसएमएस सुविधा
अॅड. सुभाष पणदूरकरः सावंतवाडीत वार्षिक बैठक
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ ः सावंतवाडी अर्बन बँक लवकरच क्यूआर कोड व एसएमएस सुविधा सुरू करत आहे. बँक दोन वर्षांमध्ये सातत्याने ऑपरेटिंग नफा मिळवत असून बँकेत चालू आर्थिक वर्षांमध्ये ४.८३ लाख रकमेने ऑपरेटिंग नफा झालेला आहे. निव्वळ एनपीए प्रमाणपत्र शुन्य राखलेले असून बँकेने कोणत्याही प्रकारची बाहेरची कर्ज घेतलेली नाहीत, असे अर्बन बँकेचे अध्यक्ष अॅड. सुभाष पणदूरकर यांनी वार्षिक बैठकीमध्ये सांगितले.
सावंतवाडी अर्बन बँकेचे ७५ वी अधिमंडळ वार्षिक बैठक नुकतीच बँकेच्या प्रधान कार्यालयात अॅड. पणदूरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी दिवंगत सभासद, मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अॅड. पणदूरकर यांनी अर्बन बँकेची आर्थिक स्थिती यावेळी उपस्थित सभासदांसमोर ठेवली.
या बँकेचे माजी अध्यक्ष, संचालक शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे बँकेच्या वतीने अध्यक्ष पणदूरकर यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगराध्यक्ष संजु परब यांचाही अॅड. पणदूरकर यांनी सत्कार केला. यावेळी सभा नोटीस वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश पास्ते यांनी केले. सभेत बँकेच्या आर्थिक पत्रकावर चर्चा करून मंजुरी देण्यात आली.
२०२२-२३ करिता रिझर्व बँकेने मान्यता दिलेल्या वैधानिक लेखापरीक्षक म्हणून मे लिमये काळे आणि कंपनीचे प्रमुख यांचे नेमणूक करण्यात आली. अंतर्गत लेखा परीक्षकांची नेमणूक करण्याचे अधिकार संचालक मंडळात देण्यात आले संचालक मंडळाने सुचविलेला अंदाजपत्रकास यावेळी मान्यता देण्यात आली. बँकेचे सभासद भाई भाईप यांनी बँक ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये आल्याबद्दल अध्यक्ष अॅड. पणदूरकर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी राजू बेग, अॅड. गोविंद बांदेकर, अॅड. पी. डी. देसाई, प्रा. सुभाष गोवेकर, रवींद्र ओगले, संतोष पई, राजेंद्र डोंगरे, सुरेश भोगटे यांनी अहवालावर प्रश्न उपस्थित सभेच्या कामकाजात भाग घेतला. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष रमेश बोंद्रे, संचालक रमेश पई, नरेंद्र देशपांडे, अशोक दळवी, राजेश पनवेलकर, उमाकांत वारंग, यल्लाप्पा नाईक, सुरेश बोवलेकर, सौ. मृणालीनी कशाळीकर, अपर्णा कोठावळे आदी संचालक, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश पास्ते उपस्थित होते. आभार प्रदर्शन बँकेचे जेष्ठ संचालक गोविंद वाडकर यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89553 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..