पावशीत युरिया खताचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावशीत युरिया खताचे वाटप
पावशीत युरिया खताचे वाटप

पावशीत युरिया खताचे वाटप

sakal_logo
By

swt२३७.jpg
४५०५२
पावशीः ग्रामपंचायतीच्यावतीने शेतकऱ्यांना युरिया खताचे वाटप करताना सरपंच बाळा कोरगावकर व इतर.

पावशीत युरिया खताचे वाटप
कुडाळः पावशी ग्रामपंचायत आयोजित शेतकरी बांधवाना ग्रामपंचायतकडून युरिया खताचे वाटप करण्यात आले. यावेळी मतदान कार्ड, आधार कार्ड लिंक करणे, ई-पीक नोंदणी, सातबारा कार्यक्रम आयोजित केले होते. याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. सरपंच बाळा कोरगावकर, तहसीलदार प्रतिनिधी म्हसकर, सर्कल पास्ते, कुडाळ तलाठी तारी, पावशी तलाठी मसुरकर, कोरगावकर, कृषी सेवक जीवन परब, उपसरपंच दीपक आंगणे, ग्रामपंचायत सदस्य प्रसाद शेलटे, सागर भोगटे, रुणाल कुंभार, ग्रामस्थ किशोर तवटे, पोलीस पाटील, शेखर शेलटे, बाबा पावसकर, मनिष तोटकेकर, गणेश वायंगणकर, पावशी ग्रामस्थ उपस्थित होते.
-------------
कुडाळात आज युवा महोत्सव
कुडाळः मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवाची निवड फेरी येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात उद्या (ता.२४) होणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील ३५ विविध महाविद्यालय सहभागी झाली आहेत. कुडाळ कॉलेजचे २६ प्रकारचे विविध इव्हेंट सहभागी होणार आहेत. ११ वर्षानंतर कुडाळ कॉलेजला युवा महोत्सव युथ फेस्टिवल सिलेक्शन राहून घेण्याची संधी प्राप्त झाली आहे. मुंबई विद्यापीठाचे समन्वयक आशिष नाईक, कॉलेजचे प्राचार्य व्ही. बी. झोडगे यांनी विशेष प्रयत्न केले व विद्यापीठाचे डॉ. सुनील पाटील यांनी त्याला मान्यता दिली. याबाबतची रूपरेषा ठरवण्यासाठी ओसरगावमधील कॉलेजमध्ये बैठक आयोजित केली होती. बैठकीत लाईव्ह इव्हेंट दाखवण्यात आले आणि युवा महोत्सवाची रूपरेषा तयार करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचा सहभागी असणारा हा युवा महोत्सव होणार असल्याचे श्री. झोडगे यांनी सांगितले.
---------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89556 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..