आमदार नाईकांच्या एकनिष्ठतेचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार नाईकांच्या एकनिष्ठतेचा गौरव
आमदार नाईकांच्या एकनिष्ठतेचा गौरव

आमदार नाईकांच्या एकनिष्ठतेचा गौरव

sakal_logo
By

swt239.jpg
45054
हुमरमळाः येथे ‘निष्ठा गौरव’ सन्मान सोहळ्यात आमदार वैभव नाईक यांना महिलांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. (छायाचित्र ः अजय सावंत)

आमदार नाईकांच्या एकनिष्ठतेचा गौरव
हुमरमळ्यात सन्मानः शिवसेना-युवासेना कार्यकर्त्यांचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २३ः विविध प्रकारच्या आमिषांना बळी पडून शिवसेनेतील अनेक आमदार-खासदारांनी शिवसेनेशी गद्दारी केली; मात्र आमदार वैभव नाईक मात्र पक्ष आणि पक्षप्रमुखांशी एकनिष्ठ राहिले. याबद्दल हुमरमळा-वालावल गावाच्या वतीने आयोजित ‘निष्ठा गौरव’ सन्मान सोहळ्यात महिलांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी शाल, श्रीफळ, छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतीक असलेली तलवार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
सुरुवातीला माड्याचीवाडी ते हुमरमळापर्यंत भव्य दुचाकी रॅली काढून ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतशबाजीत आमदार नाईक यांचे हुमरमळा गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले. महिलांनी पुष्पवृष्टी करून औक्षण करत कार्यक्रम स्थळी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांचा सन्मान करण्यात आला.
शिवसेना-युवासेना कुडाळच्या वतीने शिवसेना शाखेसमोर त्याचबरोबर शिवसेना, युवासेना हुमरमळा येथे शुक्रवारी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दोन्ही ठिकाणी आमदार नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दहीहंडी उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. हुमरमळा येथे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कुडाळ नक्षत्र टॉवरसमोर हेल्प ग्रुपच्या दहीहंडी उत्सवाला आमदार नाईक यांनी भेट दिली.
हुमरमळा येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर, कुडाळचे शिवसेनेचे नेते अतुल बंगे, राजू गवंडे, महेश वेळकर, प्रसाद राऊळ, सरपंच अर्चना बंगे, उपसरपंच स्नेहल सामंत, ग्रामपंचायत सदस्य कांता माड्ये, अमृत देसाई, सोनाली मांजरेकर, रमा गाळवणकर, शिवसेना शहरप्रमुख रमेश परब, युवासेनेचे वालावल पंचायत समिती विभाग प्रमुख मितेश वालावलकर, शंकर पाटकर, प्रदीप तोंडवळकर, संतोष अडुळकर, युवासेनेचे शाखाप्रमुख संदेश जाधव, युवासेनेचे उपशाखा प्रमुख आशू परब, अपूर्वा देसाई, मयूर प्रभू, अमित बंगे, शैलेश मयेकर, ओंकार कानडे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89557 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..