नाईक कुटुंब जपतेय मूर्ती कलेचा वारसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाईक कुटुंब जपतेय मूर्ती कलेचा वारसा
नाईक कुटुंब जपतेय मूर्ती कलेचा वारसा

नाईक कुटुंब जपतेय मूर्ती कलेचा वारसा

sakal_logo
By

swt२३१४.jpg
४५०४५
चेंदवणः येथील गणेश मूर्ती कार्यशाळेत श्रींच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवताना देवेंद्र नाईक.

swt२३१५.jpg
४५०४६
चेंदवणः काका गुंडू नाईक हे उतारवयातही कला जोपासत आहेत.

नाईक कुटुंब जपतेय मूर्ती कलेचा वारसा
५० वर्षांचा प्रवासः तिसऱ्या पिढीचे योगदान
अजय सावंत ः सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २३ ः स्वातंत्र्यपूर्व काळापासून चेंदवण येथील गणेश मूर्ती कार्यशाळा चालविणाऱ्या (कै.) आप्पा नाईक यांच्या कलेचा वारसा आजतागायत नाईक कुटुंब चालवीत आहेत. विशेष म्हणजे या घराण्याने अहमदाबाद येथे सुद्धा गेले ४५ ते ५० वर्ष गणेश मूर्ती साकारल्याने आपल्या कलेचा झेंडा या ठिकाणी रोवला आहे हे विशेष म्हणावे लागेल.
तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात असलेले चेंदवण गाव आपल्या विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. सिनेसृष्टी नाट्यसृष्टीतील अनेक कलाकार या लाल मातीतून होऊन गेले. त्यांचा वारसा अनेक कलाकार जोपासत आहेत. चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाच्या माध्यमातून दशावतार लोककला या ठिकाणी जोपासली जात असताना या मंडळाचे मालक व माजी सरपंच उद्योजक देवेंद्र नाईक हे गणेशमूर्ती कलाकार सुद्धा आहेत. श्री. नाईक राजकीय क्षेत्रात वाटचाल करीत असतानाच एक दशावतार नाट्य मंडळ सांभाळत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या नाईक घराण्याची गणेश कार्यशाळा आजोबांच्या कारकिर्दीत नावाजलेली होती. पंचक्रोशीत अप्पा नाईक हेच गणेश मुर्तीकर असल्याने त्यावेळी मोठया प्रमाणात गणेशमुर्त्या बनविल्या जात. आता वाडीवाडीत गणेश कार्यशाळा झाल्या असल्यातरी नाईक घराणे मात्र आजोबांच्या कलेचा वारसा जोपासत आहे. यामध्ये देवेंद्र नाईकांसह त्यांचे काका गुंडू नाईक, इतर बंधू, अहमदाबाद येथील भाऊ विजय नाईक हे या गणेशमूर्ती साकारण्याचे काम करीत आहेत. कार्यशाळेबाबत बोलताना नाईक म्हणाले, "माझे आजोबा (कै.) आप्पा नाईक हे गेली ५० वर्षे कार्यशाळेत गणेश मूर्ती साकारण्याचे काम करीत होते. त्यावेळी पंचक्रोशीमध्ये मूर्ती बनवण्याची संख्याही मोठ्या प्रमाणात होती. गेल्या काही वर्षापासून प्रत्येक ठिकाणी गणेश कार्यशाळा झाल्यामुळे आजोबांनी जोपासलेली ही गणेश मुर्ती कार्यशाळा आपल्या घराण्याने परंपरांगत असल्याने पुढे अविरत सुरू ठेवावी या उद्देशाने आमचे काका, आम्ही सर्व बंधू गणेश कार्यशाळा अविरत सुरू ठेवली आहे."

चौकट
अहमदाबादमध्येही कार्यशाळा
देवेंद्र नाईक यांचे बंधू विजय नाईक यांनी गेली ४७ वर्षे अहमदाबादमध्ये गणेशमूर्ती कार्यशाळा सुरू ठेवली आहे हे विशेष आहे. या शाळेमध्ये गणेशभक्त मोठ्या प्रमाणात श्री गणेशमूर्तीसाठी मागणी करतात.

कोट
सध्या आमच्या गणेश कार्यशाळेत विविधांगी सुबक आकर्षक अशा पंचवीस ते तीस गणेश मुर्त्या साकारल्या आहेत. गणेश भक्तांच्या मागणीनुसार गणेश मूर्ती साकारण्यात आल्या आहेत. माती रंगाचे वाढलेले दर लक्षात घेता तसेच कोरोना असताना गणेश भक्तांना त्यांना परवडतील अशा किमतीत गणेशमुर्त्या देण्यासाठी नाईक घराणे सज्ज झाले आहेत. या गणेशभक्तांच्या सेवेतच मिळणारा आनंद आमचा आनंद दिगुणीत करणारा आहे.
- देवेंद्र नाईक, मूर्तीकार

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89558 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..