गुहागर ः बॉक्साईटच्या अवैध वाहतुकीवर कारवाई करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुहागर ः बॉक्साईटच्या अवैध वाहतुकीवर कारवाई करा
गुहागर ः बॉक्साईटच्या अवैध वाहतुकीवर कारवाई करा

गुहागर ः बॉक्साईटच्या अवैध वाहतुकीवर कारवाई करा

sakal_logo
By

-rat२३p८.jpg
45071
- गुहागर ः पोमेंडी येथे आगीत खाक झालेला ट्रक.
----------
अवैध वाहतुकीवर कारवाई करा

डॉ. विनय नातूंची मागणी; क्षमतेपेक्षा अधिक वजन
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २३ ः गेले अनेक महिने गुहागर तालुक्यातील काताळे येथून सागरी महामार्गांवर बॉक्साईटच्या अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. पोलिस यंत्रणा व परिवहन अधिकारी यांचे लक्ष नसल्याने किंवा यांच्या संगनमताने व काहीजणांच्या आशीर्वादाने बॉक्साईटच्या नावाखाली अवैध पास बनवून वाहतूक सुरू आहे. या वाहनांचे क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात वजन भरले जाते. त्यामुळे या अवैध वाहतुकीवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केली आहे.
रविवारी (ता. २२) रात्री पोमेंडी फाटाजवळ ट्रकला लागलेल्या आगीची भीषणता लक्षात घेतली पाहिजे. सदर ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक माल होता. त्यामुळेच रस्त्यावर घर्षणाने मागच्या टायरनी प्रथम पेट घेतला. नंतर ही आग पुढे आली. ट्रकचा डिझेल टँकही पेटला. सुदैवाने ग्रामस्थ मदतीला धावल्याने मोठा अपघात टळला. कोकणात आता गणेशोत्सव सुरू होत आहेत. अशावेळी या अवैध वाहतुकीमुळे अपघात होऊ शकतात. तरी संबंधितांवर कारवाई करून त्यांच्यावरती अनधिकृत वाहतुकीचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी केली आहे.
------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89578 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..