चिपळूण - चिपळूणात आपदग्रस्तांच्या घऱांचे उभे राहिले '' नाम''वंत मॉडेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण - चिपळूणात आपदग्रस्तांच्या घऱांचे उभे राहिले '' नाम''वंत मॉडेल
चिपळूण - चिपळूणात आपदग्रस्तांच्या घऱांचे उभे राहिले '' नाम''वंत मॉडेल

चिपळूण - चिपळूणात आपदग्रस्तांच्या घऱांचे उभे राहिले '' नाम''वंत मॉडेल

sakal_logo
By

आपद्ग्रस्तांना मिळणार घरेः लोगो
........
rat२३p३.jpg
45058
ः चिपळूण ः निसर्गाच्या सान्निध्यात ओवळी येथे आपदग्रस्तांसाठी अशी घरे बांधण्यात आली आहेत.
----------------
पुनर्वसन सुरक्षितस्थळी; १९ घरांची उभारणी

चिपळुणात घराचे ''नाम''वंत मॉडेल; लोकसहभागासह प्रशासनाचा पुढाकार, आकलेसह ओवळीत १९ घरांची उभारणी
मुझफ्फर खान ः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २३ ः चिपळूणच्या दसपटी भागातील ग्रामस्थ, स्थानिक प्रशासन आणि नाम फाउंडेशन या तिघांनी एकत्र येऊन पुनर्वसनाचा अनोखा प्रकल्प उभा केला आहे. शासनाने ज्यांना स्थलांतरित व्हायला सांगितले होते, अशा लोकांसाठी नाम फाउंडेशनने स्थानिक प्रशासन आणि लोकसहभागातून आकले गावात १२ आणि ओवळी गावातील ७ अशी एकूण घरे बांधण्यात आली. त्यामुळे दोन्ही गावातील अनेक कुटुंबांचा स्थलांतराचा प्रश्न मिटला आहे.
नैसर्गिक आपत्ती आली की, सर्वात मोठा प्रश्न हा पुनर्वसनाचा असतो. जिल्ह्यातील चिपळूण व खेड तालुक्यात गेल्या वर्षी झालेल्या आपत्तीमध्ये अनेक लोक बेघर झाले. यावर्षी सुदैवाने मोठा पाऊस झाला नाही तरीही पावसाळ्यापूर्वी संभाव्य धोका लक्षात घेऊन अनेक भाग दरडप्रवण म्हणून घोषित करण्यात आला आणि त्या भागातील ग्रामस्थांचे स्थलांतर करण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला होता; मात्र स्थानिक ग्रामस्थ पुनर्वसनासाठी सहजा तयार होत नाहीत. झालेच तर त्यांचे पुनर्वसन करायचे कुठे, असाही प्रश्न निर्माण होतो. त्यात अनेकदा पुनर्वसन रखडते. आकले गावातील डोंगराळ भागात वसलेल्या निंबारेवाडीत खापरे कुटुंबातील चार पिढ्या राहात होत्या. तेथे एकूण १२ कुटुंबे होती.
गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात त्यांच्या वाडीला धोका निर्माण झाला. यानंतर त्यांचे स्थलांतर करण्याचे प्रशासनाकडून आदेश आले. यापूर्वीही या वाडीच्या स्थलांतराबाबत चर्चा झाली होती; मात्र, योग्य जागेमुळे ग्रामस्थ स्थलांतर होत नव्हते. प्रशासनाने त्यावर तोडगा काढताना गावातील सुरक्षित जागेत त्यांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. गावातील लोकांना अल्पदरात जमीन देण्याचे आव्हान करण्यात आले. त्याला गावातील ग्रामस्थांनी होकार दिला. ज्यांचे पुनर्वसन करायचे होते, त्यांनी गावातील लोकांकडून अल्पदरात जमीन खरेदी केली. तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी पुढाकार घेत तातडीने या जमिनी आपद्ग्रस्तांच्या नावे केली. स्थानिक तलाठी नंदगवळी आणि मंडळ अधिकारी संदेश अहिरे यांनी पाठपुरावा करत हे काम मार्गी लावले; मात्र प्रश्न घरे बांधण्याचा होता. प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी त्यासाठी नाम फाउंडेशनचे संस्थापक व अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्याशी संपर्क साधून आकले गावातील १२ व ओवळी गावातील ७ घरे बांधून देण्याची विनंती केली.
...
चौकट
सहा महिन्यांत घरे तयार...काही काम शिल्लक
दरम्यान, पाटेकर आणि अनासपुरे यांनी घर बांधण्याची तत्परतेने तयारी दाखवत या कामाला सुरवात केली. या कामासाठी नाम फाउंडेशनचे विदर्भातील स्वयंसेवक अर्जुन जेठे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी गावातच राहण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाच्या मदतीने घरे उभारणीसाठी आवश्यक चिरे, सिमेंट आणि इतर सामान अल्पदरात त्यांनी मिळवले. सहा महिन्यांत ही घरे तयार झाली आहेत; मात्र काही काम शिल्लक आहे. ते पूर्ण झाल्यानंतर आपद्ग्रस्तांना ती दिली जाणार आहेत.
-------------
कोट
आकले गावातील डोंगरात पिढ्यानपिढ्या वास्तव्य करणारे नागरिक दरवर्षी जीव धोक्यात घेऊन जगत होते. घर आणि शेतीमधील रोजचा अंतर दोन तासांचा होता. गावात कोणी आजारी पडले तरी रुग्णालयात दोन बांबूंच्या आधारे कापड लावून न्यावे लागत होते; मात्र आता निवारेवाडी पुनर्वसन झालेल्या भागात आम्ही पाचशे चौरस फुटांच्या स्वतंत्र घरात राहायला जाणार आहेत.
- महादेव खापरे, आपद्ग्रस्त आकले, ता. चिपळूण
-------------
कोट
प्रशासन, लोकसहभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीमधून काय घडू शकते, याचे अनाखे मॉडेल आकले आणि ओवळी गावात उभे राहिले आहे. ओवळी गावात आपद्ग्रस्तांसाठी घरे उभी करण्याचे काम सुरू असताना मी भेट दिली. तेव्हा या घरांमुळे आमच्या जीवाचा धोका कमी झाला असून आम्हाला कायमस्वरूपी आसरा मिळाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्या वेळी अनेकांचे डोळे पाणवले. आम्हाला जगण्याचा आनंद मिळाला, असे डोंगराळ भागात राहणाऱ्या लोकांनी सांगितले.
- जयराज सूर्यवंशी, तहसीलदार चिपळूण
..
एक नजर..
आकले गावात घरे बांधलीः १२
ओवळी गावात घरे बांधलीः ७
..
एक नजर...
चिपळूण व खेड तालुक्यात आपत्तीमुळे अनेक लोक बेघर
अनेक भाग दरडप्रवण; ग्रामस्थांना स्थलांतराचा सल्ला
आकले- निंबारेवाडीत १२ कुटुंबे होती वास्तव्याला
गतवर्षीच्या पावसाळ्यात वाडीला धोका; स्थलांतराचे आदेश
सुरक्षित जागेत त्यांचे स्थलांतर करण्याचा निर्णय
गावातील लोकांना अल्पदरात जमीन देण्याचे आव्हान
गावातील लोकांकडून अल्पदरात जमीन खरेदी केली
तहसीलदार सूर्यवंशींचा पुढाकार; जमिनी आपद्ग्रस्तांच्या नावे
घरे बांधण्यासाठी प्रशासनासह नाम फाउंडेशनचा हातभार

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y89579 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..